प्रभाग रचना हरकतींवरील सुनावणी पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभाग  रचना हरकतींवरील सुनावणी पूर्ण
प्रभाग रचना हरकतींवरील सुनावणी पूर्ण

प्रभाग रचना हरकतींवरील सुनावणी पूर्ण

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...


प्रभाग रचना हरकतींवर सुनावणी पूर्ण
बुधवारी निर्णय; तक्रारदारांनी केला जोरदार युक्तिवाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १५ : जिल्‍हा परिषद, पंचायत समिती प्रभाग रचनेवर आज पुणे येथे विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. तक्रारदारांच्या वकिलांनी जोरदार युक्ति‍वाद केला. यावरील निर्णय बुधवारी (ता. २२) दिला जाणार आहे. जिल्‍ह्यातून जवळपास १३० पेक्षा अधिक तक्रारी प्राप्‍त झाल्या आहेत. निकालावरच अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
जिल्‍हा परिषद, पंचायत समिती प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अनेकांना त्यावर हरकती घेण्यास सुरवात केली. मतदार संघांची मोडतोड, भौगोलिक परिसीमांचे उल्‍लंघन, सलगतेचा भंग झाला असल्याचे सांगत या हरकती घेण्यात आल्या. सर्वाधिक तक्रारी या हातकणंगले मतदारसंघातून प्राप्‍त झाल्या होत्या. अगदी निवडणूक आयोगापासून ते राज्यपालांपर्यंत या तक्रारी पोहोचवण्यात आल्या, तरीही जिल्‍हा प्रशासन निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे प्रभाग रचनेवर हरकती घेण्यात आल्या. या हरकतीवर आज पुणे येथे सुनावणी घेण्यात आली. त्यावर बुधवारी निर्णय होणार आहे. निर्णयाकडे जिल्‍ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या निकालावर अनेक विद्यमानांचे भवितव्य अवलंबून आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68215 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top