
सक्षम शाळा सदृढ शाळा उपक्रम
29523
‘सक्षम शाळा-सदृढ शाळा’ अभियान
जिल्हा पोलिस दलाचा पुढाकार; संस्काराबरोबर कायद्याची माहिती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः चांगल्या संस्काराबरोबर विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती देणारे ‘सक्षम शाळा-सदृढ शाळा’ हे अभियान जिल्हा पोलिस दलाने हाती घेतले आहे. त्याची सुरुवात गगनबावडा तालुक्यातून सुरू झाली. प्रभारी अधिकाऱ्यांनी ११२ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शालेय वयातच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत या उद्देशाने हे अभियान सुरू केले आहे. विद्यार्थ्यांवर चांगल्या संस्काराबरोबर कायद्यासह वाहतुकीचे नियम, सायबर क्राईम याविषयीची माहिती पोलिस अधिकारी, निर्भया पथक आणि बीट अमलदार शाळेत जाऊन देणार आहेत. तीन महिन्यांत जिल्ह्यातील सर्व शाळांत हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामधील काही शाळा दत्तक स्वरुपात घेण्यात येणार आहेत. गगबनवाडा तालुक्यातील शासकीय आश्रम शाळेतून या अभियानाची सुरुवात झाली.
अभियानात विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, सायबर गुन्हे, फसवणुकीचे प्रकार, महिला संदर्भातील कायदे, सोशल मीडिया हाताळताना घ्यावयाची काळजी, अमली पदार्थांचा होणारा दुष्परिणाम, बालविवाह, रॅगिंग कायद्याची माहिती, गुड टच बॅड टच, अल्पवयीन मुले पळून गेल्यानंतर पालकांवर होणारे परिणाम, शाळांतील तक्रार पेटी, सूचना पेटीचे महत्त्व आदींची माहिती दिली जाणार आहे. पहिल्याच दिवशी पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्यासह ५२ अधिकारी व २५६ पोलिस कर्मचाऱ्यांनी ११२ शाळांना भेटी देऊन प्रबोधन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68246 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..