भाजपकडून कॉंग्रेस तोडो अभियान सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपकडून कॉंग्रेस तोडो अभियान सुरु
भाजपकडून कॉंग्रेस तोडो अभियान सुरु

भाजपकडून कॉंग्रेस तोडो अभियान सुरु

sakal_logo
By

भाजपकडून काँग्रेस तोडो अभियान सुरू
पालकमंत्री सतेज पाटील; राहुल, प्रियांका गांधींना त्रास देण्यासाठी ईडीची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : देशात सध्या माणसा-माणसांत दुरावा आणला जात आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी उदयपूरच्या अधिवेशनात भारत जोडो अभियान सुरू केले आहे. भारत जोडो अभियानालाच शह देण्यासाठीच भाजपने काँग्रेस तोडो अभियान सुरू केले आहे का, अशी शंका पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज व्यक्त केली. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावार ईडीची कारवाई ही केवळ त्रास देण्यासाठीच असल्याचे मतही व्यक्त केले. पालकमंत्री यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘राहुल व प्रियांका गांधी यांच्यावर ईडीकडून कारवाई केली जात आहे; पण ही कारवाई केवळ त्रास देण्यासाठी केली जात आहे. आज तिसरा दिवस त्यांची चौकशी सुरू आहे. केवळ त्रास देण्यासाठी ही कारवाई होत आहे. सर्व माहिती दिली असतानाही मुद्दाहून बोलावून आणले जात आहे. केंद्र सरकारविरुद्ध कोणीही बोलू नये, असे दडपशाहीचे वातावरण निर्माण केले जात आहे. केंद्र सरकारकडून सुरू असलेली कारवाई लोकशाहीला धोकादायक आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना विरोधकांचा आवाज बंद करणे याचीही इतिहास नोंद होण्यासारखी घटना आहे. देशात ज्या एजन्सी आहेत, त्यांचा कधीही गैरवापर झाला नाही. सीआयडीची कारवाई करण्याआधी आमची परवानगी घ्यावी, असा निर्णय घ्यावा लागत आहे. यापूर्वी देश म्हणून आणि देशाची घटना म्हणून असा कोणताही निर्णय घेण्याची गरज नव्हती; पण आता ती गरज निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने अशी कारवाई थांबवली तरच लोकांचा लोकशाहीवर विश्‍वास वाढेल. भाजपकडून एजन्सीच्या कारवाईचे समर्थन करत असतील तर हे समर्थन एजन्सीकडून झाले पाहिजे. भाजपकडून कशासाठी होत आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68253 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top