ज्ञानमंदिरात पहिले पाऊल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानमंदिरात पहिले पाऊल
ज्ञानमंदिरात पहिले पाऊल

ज्ञानमंदिरात पहिले पाऊल

sakal_logo
By

29337
ज्ञानमार्गावर पहिलं पाऊल...
----------------
विद्यार्थांचा जल्लोषात प्रवेशोत्सव; उत्साही वातावरणात शाळा सुरू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः शाळांच्या प्रांगणात काढलेली आकर्षक रांगोळी, फुलांची सजावट आणि उत्साहात येणारे विद्यार्थी. अशा आनंदी वातावरणात जिल्ह्यातील शाळांना आज सुरुवात झाली. नव्या शैक्षणिक वर्षासाठी आज विद्यार्थ्यांनी ज्ञानमंदिराच्या मार्गावर पहिले पाऊल टाकले.

‘कोरगावकर''मध्ये वाजत-गाजत स्वागत
आंतरभारती शिक्षण मंडळाच्या कोरगावकर हायस्कूल, सदर बाजार येथे नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. या वेळी पाठ्यपुस्तके आणि चिक्कीचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांची लक्षणीय गर्दी होती. या वेळी कार्यक्रमात माजी मुख्याध्यापक दिनेश पावसकर, आरती जोशी, हरीश जोशी यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी मार्गदर्शन केले. मानसिंग हातकर यांनी मनोगत व्यक्त केले.


लंडन बसमधून आले विद्यार्थी
महापालिकेच्या नेहरूनगर शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत लंडन बसमधून करण्यात आले. मुलांचे ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला. नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकांचे वितरण केले. महापालिका शाळास्तरावर राबविला जाणार असलेला मी इंग्रजी बोलणार व गणित झाले सोपे या उपक्रमांच्या हस्तपुस्तिका उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या. शिक्षक निरीक्षक रवींद्र चौगले, प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार, दिलीप भुर्के, पद्मजा भुर्के, डॉ. विनायक शिंदे, महेश सावंत, मुख्याध्यापक शहाजी घोरपडे यांच्यासह सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

शिंदे विद्यालयात
जीपमधून मिरवणूक
महापालिकेच्या अण्णासो शिंदे विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या विद्यार्थ्यांना सजविलेल्या जीपमध्ये बसवून भागातून मिरवणूक काढली. विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना वाजतगाजत शाळेत आणले. लक्षतीर्थ परिसरातही दाखल विद्यार्थ्यांना आज त्यांचे औक्षण करून वर्गात प्रवेश दिला. वर्गात तोरण, फुलांच्या माळा व फुगे लावून सजविला होता. मुलांना आवडणारे फुगे व कॅडबरी दिली. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक सहभागी झाले होते.

जरग विद्यामंदिरात
४८० विद्यार्थ्यांचा प्रवेश
जरगनगर येथील महापालिकेच्या लक्ष्मीबाई जरग शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. या वेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर व प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार यांनी शाळेला भेट दिली. सुनील पाटील, मधुकर रामाणे, गीता गुरव उपस्थित होते. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या हस्ते मुलांचे स्वागत केले. पहिलीत ४८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68266 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top