आपत्ती व्यवस्थापन नियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपत्ती व्यवस्थापन नियोजन
आपत्ती व्यवस्थापन नियोजन

आपत्ती व्यवस्थापन नियोजन

sakal_logo
By

आपत्ती निवारणासाठी सूक्ष्म व्यवस्थापन
उपाययोजना तयार; धरणाच्या पाण्यापासून ते बचाव कार्यापर्यंत सतर्क
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः यावर्षी पूरस्थिती निर्माण झाली तर जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वारंवार बैठका घेऊन नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून दिली आहे.
वेळोवेळी बैठका घेऊन संबंधित प्रशासकीय विभागांना सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर धरणात उपलब्ध साठा, दैनंदिन पर्जन्यमान, पूरबाधित नागरिक व जनावरांच्या स्थलांतरासाठीचे नियोजन, बचाव व मदत कार्याचे नियोजन केले आहे. याबरोबरच त्या त्या प्रशासकीय विभागाने पूरस्थितीत पार पाडावयाच्या जबाबदारीबाबत जिल्हाधिकारी रेखावार यांनी स्वतंत्र आदेश दिले आहेत. पूर व्यवस्थापनाचे गावनिहाय नियोजन, आपापल्या स्तरावर जिल्हा, तालुका आणि गाव अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने पूर व्यवस्थापनासाठी नियोजन केले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पूरबाधित नागरिकांना मदत देणे, तात्काळ बचावकार्य सुरू करणे, नागरिक व जनावरांचे स्थलांतर, त्यांच्या निवाऱ्याची, जेवणाची व्यवस्था, जनावरांसाठी चारा, छावण्या, वैद्यकीय सुविधा व औषधोपचार, निवारागृहांत राहणाऱ्या पूरबाधितांना आवश्यक सुविधा देणे आदींबाबत नियोजन केले आहे.


आपत्कालीन कक्ष
जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत जिल्हा व तालुका स्तरावर २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज ठेवला आहे. या सर्व आपत्कालीन कक्षामध्ये २४ तास तीन सत्रामध्ये कर्मचारी कार्यरत आहेत.

पूरनियंत्रण कक्ष कार्यान्वित
जलसंपदा विभागामार्फत २४ तास पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. याद्वारे धरण क्षेत्रातील पाऊस, धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तालुका व ग्रामस्तरापर्यंत त्वरित पोहोचवण्यात येते. याची माहिती www.rtsfros.com या संकेतस्थळावर दिली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68279 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top