राखीव संवर्धीत क्षेत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राखीव संवर्धीत  क्षेत्र
राखीव संवर्धीत क्षेत्र

राखीव संवर्धीत क्षेत्र

sakal_logo
By

फोटो L29532
विशाळगड, मसाईसह चार ठिकाणे
राखीव जंगल संवर्धित क्षेत्र घोषित
राज्य सरकारकडून अधिसूचना; आजरा, चंदगडचाही समावेश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : वन्यजीवांच्या सुरक्षिततेतचा भाग म्हणून राज्य शासनाने जिल्ह्यातील चार ठिकाणे राखीव जंगल संवर्धित क्षेत्र म्हणून आज जाहीर केली आहेत. त्यात आजरा, चंदगड तिल्लारी, पन्हाळा, मसाई पठार, विशाळगड येथील जंगल क्षेत्र राखीव यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागातील जंगलातील वन्यजीवांचा वावर असलेल्या अधिवासाला सुरक्षितता मिळणार आहे. यातून जंगल संवर्धनासही मदत होणार आहे. संवर्धित क्षेत्रात सद्यस्थितीत कोणताही बदल होणार नाही, ही बाब विशेष मानली जात आहे.
आजरा, चंदगड, भुदरगड भागात घनदाट जंगल आहे. येथे वाघ, हत्ती, बिबट्या, अस्वल आदी वन्यजीवांचा वावर आहे. हा वावर विशाळगड म्हणजेच शाहूवाडी तालुक्यातील जंगलापर्यंतचा आहे. याच मार्गावरून हत्ती गेल्या दोन वर्षापूर्वी विशाळगड जंगलापर्यंत आला होता. हाच मार्ग वन्यजीवांसाठी सुरक्षित मानला जातो. या भागाला संवर्धित क्षेत्र म्हणून जाहीर केले. पन्हाळा तालुक्यातील मसाई पठार विशिष्‍ट्य भौगोलिक गुण वैशिष्‍ट्यांनी नटलेला भाग म्हणून येथील जैवविविधता अबाधित राहावी, यासाठी संवर्धित यादीत आहे.
चौकट
या क्षेत्रात पर्यटकांना फिरण्यासाठी फारशी बंधने घातलेली नाहीत. त्यामुळे सध्या ज्या मार्गावरून प्रवासी किंवा पर्यटकांची ये-जा होते, ते मार्ग पर्यटकासाठी खुले असणार आहेत.
या भागातील रहिवासी क्षेत्रातील कोणत्याही वस्ती, वाडीचे पुनर्वसन सुचविलेले नाही. त्यामुळे सध्या असलेल्या वाडी वस्त्यांचे अस्तित्व कायम राहणार आहे. राज्य शासनाने संरक्षित केलेल्या या क्षेत्रात वणवे लागू नयेत, यासाठी मात्र कडक निर्बध केले आहेत. त्यामुळे या भागात राहणाऱ्या रहिवाशांनीच या भागात वणवे लागू नयेत, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत वन विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68330 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top