गंजीवली खण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गंजीवली खण
गंजीवली खण

गंजीवली खण

sakal_logo
By

29683
29684
गंजीवली खण बनली मद्यपींचा अड्डा
जलपर्णीचा विळखा; कट्टाही चालला ढासळत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः संभाजीनगरपासून मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ ते गोखले कॉलेजच्या परिसरातील गणेशमूर्ती विसर्जनासाठी उपयोगी ठरलेल्या गंजीवली खणीची १२ वर्षांतच दुरवस्था झाली आहे. तेथील गाळ काढलेला नाही. जलपर्णीने खण व्यापली आहे. सभोवताली बांधलेला कट्टा ढासळत चालला आहे. महापालिका लक्ष देत नसल्याने रात्री मद्यपींचा अड्डा बनला आहे.
पूर्वी खुली असलेली खण तत्कालीन नगरसेवक विजय सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून २००५-२०१० दरम्यान विसर्जन कुंड, धोबी घाट बांधला. रंकाळ्यात विसर्जनास मनाई केल्याने गणेश विसर्जनासाठी या कुंडाचा पर्याय उपलब्ध झाला. दरवर्षी किमान अडीच ते तीन हजार मूर्ती येथे दान केल्या जातात. २०१५ नंतर त्याच्या शेजारी ऑक्सिजन पार्क बांधला. ८५० देशी झाडे लावून जगवली आहेत. कुंड तसेच पार्कमुळे परिसरातील नागरिकांची सोय होत आहे; पण कुंडाची दुरवस्था होत आहे. कुंडासाठी बांधलेली संरक्षक भिंत भक्कम आहे; पण कुंडाच्या पाण्याभोवती बांधलेला कट्टा ढासळत आहे. छोट्या जलपर्णीने बहुतांश तलाव व्यापला आहे. कुंडातील पाणी धोबीघाट, तसेच म्हशी धुण्यासाठी उपसा होत असल्याने दुर्गंधी नाही. लोखंडी दरवाजा केला आहे; पण त्याबाजूने आत जाता येत असल्याने रात्री मद्यपी तिथे अड्डा जमवतात. त्यांचे साहित्य परिसरात पहायला मिळत असल्याने स्वच्छतेला कुणी येत नसल्याचे स्पष्ट होते.

आत्ताच देखभाल हवी
परिसरातील नागरिकांसाठी उपयुक्त असलेला कुंड व्यवस्थित राहण्यासाठी नियमित देखभाल हवी. सध्या त्यादृष्टीने काहीच होताना दिसत नाही. किमान दुरुस्तीची कामे व गाळ उपसा झाल्यास हा कुंड चांगला राहील. शेवटच्या क्षणी धावपळ करून काहीच उपयोग होणार नाही.

कोट
उपयुक्त असलेला कुंड कायम व्यवस्थित राहण्यासाठी एखादा कर्मचारी नेमण्याची गरज आहे. तीन महिन्यांतून एकदा तरी पाण्यातील कचरा, जलपर्णी काढायला हवी. आता कुणाचेच लक्ष नाही.
-विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68359 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top