‘भावेश्‍वरी दौलत’च्या अध्यक्षपदी दीपक पाटील, कांबळे उपाध्यक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘भावेश्‍वरी दौलत’च्या अध्यक्षपदी दीपक पाटील, कांबळे उपाध्यक्ष
‘भावेश्‍वरी दौलत’च्या अध्यक्षपदी दीपक पाटील, कांबळे उपाध्यक्ष

‘भावेश्‍वरी दौलत’च्या अध्यक्षपदी दीपक पाटील, कांबळे उपाध्यक्ष

sakal_logo
By

29633
दीपक पाटील, एकनाथ कांबळे

‘भावेश्‍वरी दौलत’च्या अध्यक्षपदी
दीपक पाटील, कांबळे उपाध्यक्ष
चंदगड, ता. १६ ः बसर्गे (ता. चंदगड) येथील भावेश्‍वरी विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी ‘गोकुळ’चे माजी संचालक दीपक पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी एकनाथ कांबळे यांची निवड करण्यात आली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड सर्वानुमते करण्यात आली. नूतन पदाधिकारी व संचालकांचा माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. मावळते अध्यक्ष मारुती कुट्रे व हरिभाऊ पाटील यांच्या कार्याचे पाटील यांनी कौतुक केले. शासनाची बंडिंग योजना राबविणारी ही राज्यातील पहिली सेवा संस्था असल्याबद्दलही त्यांनी माहिती दिली. संस्थेचा कारभार पारदर्शी आणि सभासदांच्या हिताचा करावा, असे आवाहन केले. या वेळी मारुती पाटील, गावडू पाटील, संजय कलखांबकर, नारायण पाटील, वसंत चव्हाण, सुगंधा पाटील, रुक्मिणी बोंगाळे, राजू वेसनेकर, यलाप्पा गोंधली, लक्ष्मण पाटील, तुकाराम कांबळे, सागर गुरव, तुकाराम बेनके, तुकाराम पाटील, ईश्‍वर कांबळे, नारायण चव्हाण यांच्यासह सभासद उपस्थित होते. राम पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68410 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top