चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या
चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या

चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

ज्योति बागवे प्रथम
चंदगड : पाटणे (ता. चंदगड) येथील शहाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा बारावी कला शाखेचा निकाल ९३.३३ टक्के लागला. ३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २८ उत्तीर्ण झाले. ज्योति बागवे हिने ७६ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. संपदा कांबळे ७३.५०, प्रतिक्षा चव्हाण ६३.६६ यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. प्राचार्य एन. जे. लांडे, प्रा. एन. एस. पाटील, प्रा. पी. डी. पाटील, प्रा. एस. बी. बामणे यांचे मार्गदर्शन लाभले.
-----------------
चंदगडला २४ रोजी पिक विमा शिबिर
चंदगड : भारतीय किसान संघाच्या येथील शाखेतर्फे २४ तारखेला किसान पिक योजना व विमा योजना शिबिर आयोजित केले आहे. तालुका कृषी अधिकारी सुनील जगताप मार्गदर्शन करणार आहेत. राम मंदिरमध्ये सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत हे शिबिर होणार आहे. शेतकऱ्यांनी किसान संघाच्या येथील कार्यालयात संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन अनिकेत मांद्रेकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68415 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top