अनिकेत मानेचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनिकेत मानेचा सत्कार
अनिकेत मानेचा सत्कार

अनिकेत मानेचा सत्कार

sakal_logo
By

29635
----
अनिकेत मानेचा सत्कार
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयाचा खेळाडू अनिकेत माने याने खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले. हरियाणातील पंचकूला येथे झालेल्या चौथ्या खेलो इंडिया यूथ गेम्स राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेत त्याने उंच उडी स्पर्धेमध्ये नवीन विक्रम केला. २.७ मीटर उंच उडी मारून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. गुजरातमधील नंदीयाड येथे २.६ मीटर उंचउडी मारून थोडक्यात त्याचे सुवर्णपदक हुकले होते. तोच विक्रम मोडीत काढून खेलो इंडिया यूथ स्पर्धेमध्ये त्याने २.७ मीटर इतकी उंच उडी मारून सुवर्णपदक मिळवून एक सेंटिमीटरने स्वतःचा विक्रम तयार केला आहे. त्याने महाराष्ट्राला ॲथलेटिक्स खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले आणि महाविद्यालयाचा झेंडा अटकेपार लावला. अनिकेत हा बेंगलोर येथे भारतीय ऑलिम्पिकची खेळाडू सहाना कुमारी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्याचा प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्याहस्ते सत्कार केला. प्रा. मेजर मोहन विरकर, प्रा. मुजफ्फर लगीवाले, प्रा. प्रशांत कांबळे व वडील सुभाष माने यांचे मार्गदर्शन लाभले.
- - - - - - - - - - - - -
29634

न्यू हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार
इचलकरंजी : दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील बारावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल १००, वाणिज्य शाखा ८९.७९ तर कला शाखेचा निकाल ८०.४१ टक्के लागला. विज्ञान शाखेत अनुक्रमे अमर शिंदे ९१.००, चैताली बोहरा ८९.३३, वृषाली आरगे ८७.८३ टक्के, वाणिज्य शाखा त्रिशाली कांबळे ७३.८३, गौरी लोहार ६९.६६, ऋतुजा मगदूम व अरुण कालेकर ६८ टक्के, कला शाखेत सुप्रिया हंकारे ८७.३३, रुपाली नरवाडे ८२.००, अक्षता कांबळे ७५.१६ टक्के गुण मिळाले. विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन अरुणराव खंजिरे, मुख्याध्यापक एस. ए. पाटील यांच्याहस्ते केला.

- - - - - - - - -
हाडांचे तपासणी शिबिर
इचलकरंजी : महेश सेवा समिती व माहेश्‍वरी महिला मंडळाच्या वतीने मोफत हाडांच्या तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात हाडांच्या विविध आजारावर मार्गदर्शन व उपचार केले जाणार आहेत. शनिवारी (ता. २५) सकाळी १९ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर महेश सेवा समिती येथे होणार आहे. शिबिरासाठी नोंदणी अनिवार्य असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
------------
‘स्वर संगम’तर्फे कार्यक्रम
इचलकरंजी : स्वर संगम परिवारातर्फे गीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (ता.१८) सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम श्रीमंत घोरपडे नाट्यगृह येथे होणार आहे. हिंदी, मराठी चित्रपट गीतांचा सादर होणाऱ्या या कार्यक्रमात स्वर संगम परिवारातील कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमासाठी मोफत प्रवेश असून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68437 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top