सर्किट बेंच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्किट बेंच
सर्किट बेंच

सर्किट बेंच

sakal_logo
By

२९७०१

सर्किट बेंचप्रश्‍नी पाठपुरावा करू
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुरूगन; जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाची भेट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः केंद्रीय मस्त्य पशुपालन, डेअरी मंत्रालय सूचना व प्रसारण राज्यमंत्री डॉ. लोगनाथन मुरूगन यांनी सर्किट बेंचबाबत आवश्यक तो पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिली. जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आज त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुरूगन आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शासकीय विश्रामगृहावर ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. डॉ. संतोष शहा यांनी सर्किट बेंचच्या लढ्याची माहिती दिली. मंत्री डॉ. मुरूगन यांनी, मद्रास उच्च न्यायालयात मी वकिली केली आहे. सर्वसामान्य पक्षकारास जलद व स्वस्त न्याय मिळाला पाहिजे, याची मला जाणीव आहे. कोल्हापुरात सर्किट बेंचची सहा जिल्हे एकत्रित मागणी करीत असतील तर ती लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करू, असे त्यांनी आश्‍वासन दिले.
भाजप शहराध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे, उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, सचिव ॲड. विजयकुमार ताटे- देशमुख, ॲड. संदीप चौगुले, ॲड. तृप्ती नलवडे, ॲड. स्वप्निल चिल्ले, ॲड. वारणा सोनवणे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68473 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top