
ओबीसी
29715
ओबीसींचे योग्य सर्वेक्षण करा
--
भाजप ओबीसी मोर्चाचे निवेदन; आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर, ता. १६ ः ओबीसींचे योग्य सर्वेक्षण व्हावे, बीएलओंची प्रभागनिहाय यादी व मोबाईल नंबर मिळावेत अन्यथा भाजप आंदोलन करेल, असा इशारा भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी निवेदनाद्वारे दिला. निवेदनात म्हटले आहे, शहरात सुमारे १ लाख ६० हजार मिळकती आहेत. दीड लाखांच्या जवळपास कुटुंबे असतील. ओबीसी सर्वेक्षणासाठी कुटुंबांची पाहणी केली. त्याचा अहवालही ऑनलाईन सादर केला. प्रत्येक घरात जाऊन काम केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे कुणालाही पटणारे नाही. हे काम फक्त आठवड्यात पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. ८१ प्रभागांपैकी अनेक प्रभागात कर्मचारी गेले नसल्याचे समोर आले आहे. निम्म्यापेक्षा जास्त कुटुंबांना सर्वेक्षणाची माहितीच नाही. काही ठिकाणी फक्त आडगाव विचारून सांगण्यात आले. केवळ आडनावावरून ओबीसी ठरणार नाहीत. विविध जातीत एकसारखी आडनावे आहेत. या पद्धतीमुळे चुकीचे आकडे समोर येतील. ओबीसींचे कायमचे नुकसान होईल. याची दखल घ्यावी. भाजपचे सत्यजित कदम, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश यादव, प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार, महिला मोर्चा अध्यक्षा विद्या बनछोडे, संतोष सोनार, अरविंद वडगावकर, राजेंद्र कुंभार, संध्या तेली, आरती आडूरकर, छाया ननावरे, भाग्यश्री पोवार, माधुरी रोळे, चिनार गाताडे, प्रज्ञा मालंडकर, पूजा शिराळकर आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68516 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..