
‘इचलकरंजी परिसर कर्जदार, जामिनदार’तर्फे निदर्शने
29712
----------
‘इचलकरंजी परिसर कर्जदार, जामिनदार’तर्फे निदर्शने
इचलकरंजी, ता. १६ : जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करणारी कागदपत्रे दाखल करून नकाते यांच्या विरोधात जप्तीचा आदेश मिळवला, असा आरोप करत इचलकरंजी परिसर कर्जदार, जामीनदार हक्क बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने युनियन बँकेवर आंदोलन केले. बँकेच्या कामकाजाविरोधात घोषणाबाजी करत येथील बँकेसमोर निदर्शने केली. आंदोलनाची माहिती मिळताच गावभाग पोलिस दाखल झाले. पोलिसांनी मध्यस्थीची भूमिका बजावत बँक व्यवस्थापक आणि आंदोलक यांच्यात चर्चा घडवून आणली.
युनियन बँकेतून नकाते यांनी कर्ज काढले होते. मात्र कोरोनासह अनेक संकटांमुळे पूर्ण कर्जाची परतफेड करता आली नव्हती. त्यामुळे बँकेने दिशाभूल करणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांकडून जप्तीचा आदेश मिळवला. ही कारवाई थांबवण्याची मागणी करूनही अधिकारी योग्य वागणूक देत असल्याने नकाते यांनी इचलकरंजी परिसर कर्जदार, जामीनदार हक्क बचाव संघर्ष कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, आज कारवाईविरोधात कृती समितीच्या वतीने बँकेसमोर निदर्शने केली. आंदोलनाची माहिती मिळताच गावभागचे पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार दाखल झाले. त्यांनी मध्यस्थीची भूमिका बजावत व्यवस्थापक आणि आंदोलक यांच्यात चर्चा घडवून आणली. या वेळी आंदोलकांनी विविध कारणांनी आर्थिक घडी विस्कटली आहे. सद्यस्थितीचा विचार करून सुरू असलेली चुकीची कारवाई थांबवण्याची मागणी केली. आंदोलनात सुधीर उत्तूरे, सतीश लाटणे, मिलिंद कांबळे, संजय जकाते, मनोहर रेडेकर, तुकाराम आंबोले, महेश धारवट, संजय शिरदवाडे, माणिक पुजारी, दीपक नकाते, संजय वाली, नरेंद्र भोरे आदी सहभागी झाले होते.
- - - - - - - - -
जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित खातेदाराच्या जप्तीचा आदेश दिला असली तरी कोणतीही जप्ती केली जाणार नाही. बँकेकडून खातेदाराला कर्जासाठी आणखी अवधी दिला जाईल. याबाबत न्यायालयात लेखी म्हणणे मांडले आहे.
-माणिक चौधरी, बँक व्यवस्थापक
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68523 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..