अस्वस्थपर्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अस्वस्थपर्व
अस्वस्थपर्व

अस्वस्थपर्व

sakal_logo
By

फोटो ः 29793

श्रीराम पवार यांच्या
‘अस्वस्थपर्व'' पुस्तकावर
आज विद्यापीठात परिचर्चा
कोल्हापूर, ता. १६ ः ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक व राजकीय विश्‍लेषक श्रीराम पवार यांच्या ‘अस्वस्थपर्व'' या पुस्तकावर उद्या (ता. १७) परिचर्चेचे आयोजन केले आहे. शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र विभाग व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटतर्फे ही चर्चा होईल. शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीमधील अर्थशास्त्र विभागाच्या सभागृहात दुपारी चारला हा कार्यक्रम होईल.
जगभरात सध्या धर्म-जात, वंशाच्या आधारावर बहुसंख्याकवाद बोकाळतो आहे आणि त्यातून अनेक प्रकारचे ताण निर्माण होऊ लागले आहेत. अस्वस्थ करणाऱ्या या अलीकडच्या काळातील जागतिक घडामोडींचे अगदी सोप्या भाषेत परखडपणे विश्‍लेषण करताना भविष्याचा वेध घेणारे हे पुस्तक आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत परिचर्चेला प्रारंभ होईल. ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर अध्यक्षस्थानी असतील. ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक डॉ. प्रकाश पवार, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. रोहन चौधरी यांचा सहभाग असेल. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. नितीन माळी यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68587 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top