वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत
वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत

वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत

sakal_logo
By

वैधता प्रमाणपत्रासाठी अर्जाचे आवाहन
कोल्हापूर : ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलेला नाही, त्यांनी अर्ज सादर करावेत. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य उमेश घुले यांनी केले आहे. वैधता प्रमाणपत्राअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रमाणपत्र दिले जात आहे. २०२२-२३ वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. समितीकडे अर्ज केल्यानंतर तीन महिन्यांत वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला नाही त्यांनी त्वरित अर्ज करावा, असे श्री. घुले यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68647 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top