
निवृत्त कर्मचारी कार्यशाळा
२९७९८-९९
निवृत्तिवेतनधारकांच्या
उपक्रमांचा लाभ घ्या
---
उपमहालेखाकार राजू; पेन्शन अदालतीत शंकांचे निरसन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : निवृत्तिवेतनधारकांसाठी प्रधान महालेखापाल कार्यालयातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून, निवृत्तिवेतनधारकांनी उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमहालेखाकार जिष्णू जे. राजू यांनी आज येथे केले. जिल्ह्यातील निवृत्तिवेतनधारकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात पेन्शन अदालतीत ते बोलत होते.
जिष्णू राजू म्हणाले, ‘‘निवृत्तिवेतनधारकांच्या समस्या निराकरणासाठी पेन्शन संवाद, व्हॉइस मेल, टोल फ्री क्रमांक, नॉलेज चॅनेल असे विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. समस्या कळविण्यासाठी व्हॉईस मेल सेवा देण्यात आली. तसेच, टोल फ्री क्रमांकावर पेन्शनसंबंधी समस्यांबद्दल थेट प्रतिनिधींशी संपर्क साधता येतो.’’
कोशागार अधिकारी अरुणा हसबे म्हणाल्या, ‘‘महालेखापाल कार्यालयातर्फे राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पेन्शन अदालतीच्या माध्यमातून निवृत्त अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबतच्या अडचणींचे जलद निराकरण करण्यात येते. हा स्तुत्य उपक्रम असून, भविष्यात या उपक्रमाला आणखी गती येईल.’’
या वेळी निवृत्तिवेतनधारकांनी निवृत्तिवेतन प्रकरणाबाबत येणाऱ्या अडचणी मांडून याबाबत प्रश्न विचारले. या वेळी त्यांचे निराकरण करण्यात आले. उपमहालेखापाल (प्रशिक्षणार्थी अधिकारी) सौरभ व्हटकर, अप्पर कोशागार अधिकारी प्रशांत जाधव, शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव रमेश लिधडे, वरिष्ठ लेखाधिकारी राजू राम्मानी, सहायक लेखाधिकारी विमल पण्णीकर, वरिष्ठ लेखापाल पूर्णिमा कुकडे, वरिष्ठ लेखापाल संदीप मिसाळ, तसेच जिल्ह्यातील निवृत्त अधिकारी, कर्मचारी व या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68672 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..