आवश्यक- पुस्तक प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक- पुस्तक प्रकाशन
आवश्यक- पुस्तक प्रकाशन

आवश्यक- पुस्तक प्रकाशन

sakal_logo
By

29821
पाटील दाम्पत्याने
समाजात आदर्श निर्माण केला
डॉ. रूपा शहा ः ‘अनु-जयाची सोनपावलं’ पुस्तकाचे प्रकाशन
उचगाव, ता. १७ ः प्रेमविवाहानंतर कष्ट उपसत आलेल्या संकटावर मात केलीच. त्याशिवाय आपल्यातील कला व क्रीडा कौशल्यातून जीवन समृद्ध केले. अशा जयवंत आणि अनिता पाटील या दाम्पत्याने समाजात आदर्श निर्माण केला असल्याचे मत दिलासा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. रूपा शहा यांनी व्यक्त केले. पाटील दाम्पत्याच्या ‘अनु-जयाची सोनपावलं’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, बाबा महाडिक, गणेश मानुगडे, प्रदीप खोचगे, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी आदी उपस्थित होते. पाटील दाम्पत्य नव्या पिढीच्या जीवनालाही सामाजिक बांधिलकीतून आकार देत असल्याचे ॲड. पठाडे यांनी सांगितले. विष्णू जोशीलकर यांनी पैलवानांनीही आपला प्रवास शब्दबद्ध केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कृष्णात चौगुले, सुभा- पाटील, भाग्यश्री पाटील, श्रेयस वाईंगडे, संग्राम यादव, शिवाजी पाटील, अवी माने, नीलेश संकपाळ, गणेश चव्हाण, सचिन राठोड, उत्तम मोरे, किरण चौगुले, कृष्णात माने आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68714 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top