नवीन बांधकामाला विरोध - | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन बांधकामाला विरोध -
नवीन बांधकामाला विरोध -

नवीन बांधकामाला विरोध -

sakal_logo
By

29826

ब्रह्मपुरी मैदानाची खोदाई पाडली बंद

जुना बुधवार पेठेतील नागरिकांचा विरोध
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः पंचगंगा स्मशानभूमीसमोरील ब्रह्मपुरी मैदानात महानगरपालिकेने शेडसाठी सुरू केलेली खोदाई जुना बुधवार पेठेतील खेळाडू व ख्रिश्‍चन समाजाने आज विरोध करून बंद पाडली. परिसरातील खेळाडूंना खेळण्यासाठी ही एकमेव जागा आहे. त्यामुळे त्यात खोदाई न करता बांधकाम करावे, अशी मागणी यावेळी केली.
पंचगंगा स्मशानभूमीसमोर असलेल्या लाकूड, शेणी साठवण्याच्या शेडजवळ नवीन शेडचे बांधकाम केले जाणार आहे. त्यासाठी पलिकडे असलेल्या ख्रिश्‍चन समाजाच्या मैदानात खोदाई केली. त्यामुळे मैदान संपवण्याचा घाट महानगरपालिकेने घातल्याचा आरोप करत जुना बुधवार पेठ क्रिकेट क्लबचे खेळाडू व ख्रिश्‍चन समाजाने काम बंद पडले. सर्व्हेअर सागर शिंदे यांना धारेवर धरले. तसेच सुशील भांदिगरे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी माजी नगरसेवक धनंजय सावंत, नंदू मोरे; तसेच अरुण खोडके, उदय भोसले आदी जमले. त्यांनी खोदाईला विरोध करत आधी असलेल्या शेडच्या मापाप्रमाणे बांधकाम करावे. जादा खोदाई करू नये, असे सांगितले. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते काम थांबवले. तसेच जुन्या शेडच्या मापाप्रमाणे बांधकाम करू, असे सांगितले. यावेळी अरुण सावंत, बबन शिंदे, सतीश कांबळे, संजय आवळे, संतोष भोसले, कुणाल भोसले, महेश भालेराव आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68725 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top