गडहिंग्लजला केवळ नऊ विद्यार्थी अनुत्तीर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला केवळ नऊ विद्यार्थी अनुत्तीर्ण
गडहिंग्लजला केवळ नऊ विद्यार्थी अनुत्तीर्ण

गडहिंग्लजला केवळ नऊ विद्यार्थी अनुत्तीर्ण

sakal_logo
By

गडहिंग्लजला केवळ नऊ विद्यार्थी अनुत्तीर्ण
दहावी परीक्षा; ५९ शाळांचा १०० टक्के निकाल
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : कोरोना प्रादुर्भावाच्या काळातच झालेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला. अख्ख्या तालुक्यातून केवळ नऊच विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तीन हजार ४०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा ९९.७३ टक्के इतका विक्रमी निकाल लागला. ६७ पैकी तब्बल ५९ शाळांनी निकालाची शंभरी गाठली आहे.
कोरोनाच्या काळातच दहावीची परीक्षा झाली होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ज्या-त्या शाळेतच दहावीची परीक्षा झाली होती. या बदललेल्या परीक्षा पद्धतीचे प्रतिबिंब आज जाहीर झालेल्या निकालातून दिसून येत आहेत. तीन हजार ४१० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी तीन हजार ४०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अवघे नऊ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तब्बल दोन हजार ४३६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. तर उत्तीर्ण श्रेणीत एकही विद्यार्थी नाही. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एकला निकाल जाहीर झाला. बहुतांश विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलवरच निकाल पाहिला. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला.
शाळानिहाय निकाल असा : महाराणी राधाबाई हायस्कूल गडहिंग्लज (१०० टक्के), न्यू इंग्लिश स्कूल नूल (१००), हलकर्णी भाग हायस्कूल हलकर्णी (१००), एस. एस. हायस्कूल नेसरी (१००), गडहिंग्लज हायस्कूल गडहिंग्लज (९८.९१), न्यू इंग्लिश स्कूल कडगाव (१००), न्यू इंग्लिश स्कूल कौलगे (९६.२९), परिश्रम विद्यालय दुंडगे (१००), श्री शिवाजी विद्यालय महागाव (१००), वि. दि. शिंदे हायस्कूल गडहिंग्लज (१००), व्ही. बी. नौकुडकर हायस्कूल मुंगूरवाडी (१००), यशोदाबाई घोरपडे हायस्कूल हसूरचंपू (९७.६१), जागृती माध्यमिक प्रशाला गडहिंग्लज (९९.६५), महाराष्ट्र हायस्कूल अत्याळ (१००), न्यू इंग्लिश स्कूल मुगळी (१००), सेनापती प्रतापराव गुर्जर हायस्कूल नेसरी (१००), एस. एम. हायस्कूल बसर्गे (१००), महात्मा गांधी हायस्कूल नरेवाडी (१००), महात्मा फुले हायस्कूल बटकणंगले (९८.४१), महात्मा फुले विद्यालय महागाव (९८.८०), साधना हायस्कूल गडहिंग्लज (१००), श्री कल्लेश्वर हायस्कूल भडगाव (९७.९५), श्री. कमलेश्वर विद्यालय सांबरे (१००), श्री राम हायस्कूल नांगनूर (१००), न्यू इंग्लिश स्कूल हेब्बाळ जलद्याळ (१००), ए. आर. देसाई हायस्कूल तेरणी (१००), जय भारत हायस्कूल महागाव (१००), सिंबायोसिस स्कूल हरळी बुद्रुक (१००), श्री दुरदुंडेश्वर हायस्कूल मुत्नाळ (१००), श्री रामलिंग हायस्कूल नूल (१००), सावित्रीबाई फुले हायस्कूल करंबळी (१००), दादा देसाई हायस्कूल इंचनाळ (१००), पार्वती हायस्कूल औरनाळ (१००), ज्ञानसागर विद्यानिकेतन हसुरवाडी (१००), व्ही. के. चव्हाण-पाटील विद्यालय नेसरी (१००), न्यू इंग्लिश स्कूल चन्नेकुपी (१००), कळविकट्टे हायस्कूल कळविकट्टे (१००), हिडदुग्‍गी हायस्कूल हिडदुग्‍गी (१००), शंकरराव शिंदे हायस्कूल हडलगे (१००), हिरण्यकेशी विद्यालय हिरलगे (१००), हिरण्यकेशी विद्यालय हरळी खुर्द (१००), राजर्षी शाहू हायस्कूल कानडेवाडी (१००), कडलगे हायस्कूल कडलगे (१००), क्रांतीवीर इब्राहिम मकानदार हायस्कूल ऐनापूर (१००), गर्ल्स हायस्कूल कडगाव (१००), गोविंदराव माळी हायस्कूल गडहिंग्लज (९५), गिजवणे हायस्कूल गिजवणे-आजरा रोड (१००), गिजवणे हायस्कूल गिजवणे-कडगाव रोड (१००), जरळी हायस्कूल जरळी (१००), श्री शिवराय हायस्कूल नंदनवाड (१००), ऊर्दू हायस्कूल गडहिंग्लज (१००), श्री भैरवनाथ हायस्कूल बड्याचीवाडी (१००), न्यू इंग्लिश स्कूल खणदाळ (१००), क्रिएटिव्ह हायस्कूल गडहिंग्लज (१००), डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल गडहिंग्लज (१००), श्री. रवळनाथ माध्यमिक विद्यालय कुमरी (१००), हलकर्णी ऊर्दू हायस्कूल हलकर्णी (१००), मांगनूर सावतवाडी हायस्कूल मांगनूर सावतवाडी (१००), हनिमनाळ हायस्कूल हनिमनाळ (१००), बी. आर. चव्हाण इंग्लिश मीडियम स्कूल चन्नेकुपी (१००), लोटस इंग्लिश स्कूल (१००), प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल नेसरी (१००), सेंट झेवियर स्कूल नेसरी (१००), एस. एस. इंग्लिश मीडियम स्कूल नेसरी (१००), हलकर्णी भाग इंग्लिश मीडियम स्कूल हलकर्णी (१००), दीप इंग्लिश मीडियम स्कूल दुंडगे (१००), साधना हायस्कूल गडहिंग्लज (१००).

चौकट...
दृष्टिक्षेपात गडहिंग्लजचा निकाल...
- परीक्षेला बसलेले विद्यार्थी.................. ३,४१०
- उत्तीर्ण विद्यार्थी............................... ३,४०१
- अनुत्तीर्ण विद्यार्थी............................९
- विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी.... २,४३६
- प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी........... ८०२
- व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी........ १६३

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68826 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top