दहावी निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावी निकाल
दहावी निकाल

दहावी निकाल

sakal_logo
By

दहावी परीक्षेचा निकाल..
---------------------

गगनबावडा तालुक्याचा निकाल ९९ टक्के
असळज : दहावी परीक्षेत गगनबावडा तालुक्याचा निकाल ९९.४१ टक्के लागला आहे. तालुक्‍यातील बारा शाळांपैकी तब्बल १० शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. तालुक्यातून एकूण ५१६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी ५१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्‍बल २९३ विद्यार्थी विशेष प्रावीण्‍यासह उत्तीर्ण झाले. शाळानिहाय निकाल असा, कंसात टक्केवारी - परशुराम विद्यामंदिर (१००), दत्ता‍जीराव मोहिते पाटील विद्यालय, तिसंगी (९८.६८), शासकीय आश्रमशाळा बोरबेट (१००), उदयसिंह पाटील माध्यमिक विद्यालय असळज (१००), माध्यमिक विद्यालय शेळोशी (९६.८७), यशवंत माध्यमिक विद्यालय असंडोली (१००), श्रीराम हायस्कूल बावेली (१००) , रामेश्वर हायस्‍कूल मणदूर (१००), माध्यमिक विद्यालय, सांगशी (१००), संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, शेणवडे (१००), आर्या पब्लिक स्कूल अणदूर (१००), अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा (१०० टक्के).

कागल तालुक्याचा निकाल ९८ टक्के
कागल : मार्च २०२२ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत कागल तालुक्याचा निकाल ९८.३५ टक्के लागला. एकूण ४०१६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३९४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील ७७ शाळांपैकी ४९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. उत्तीर्ण ३९४६ विद्यार्थ्यांपैकी २२४७ विद्यार्थी विशेष गुणवतेसह, तर १२४८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. द्वितीय श्रेणीत ४०१, तर पास श्रेणीत ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकाल
पन्हाळा ः येथील नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेचा दहावी परीक्षेत १०० टक्के निकाल लागला. शाळेचे एकूण ५२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. अनुक्रमे यशस्वी विद्यार्थी असे व टक्केवारी ः गायत्री मानसिंग यादव (९७.००), सलोनी नंदकुमार लादे (९७), हर्ष सतीश कारखिले (९४.६०). स्कूलचे ९० ते ९७ टक्के - एकूण १३ विद्यार्थी. ८० ते ८९ टक्के एकूण २५ विद्यार्थी. ७० ते ७९ टक्के एकूण ९ विद्यार्थी. ६० ते ६९ टक्के एकूण ५ विद्यार्थी. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष संदीप नरके यांचे प्रोत्साहन, प्राचार्या महेश्वरी चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

मोहरे हायस्कूलचा १०० टक्के निकाल
बोरपाडळे : मोहरे (ता. पन्हाळा) येथील सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मोहरे हायस्कूल मोहरे या शाळेचा १० चा बोर्ड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. अनुक्रमे यशस्वी विद्यार्थी असे, सृष्टी जगताप व अदिती झेंडे (९३), सानिका नलवडे (९२), निर्जला सुतार (९२). यशस्वी विद्यार्थ्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. शिवाजी मोरे, संस्थाध्यक्ष प्रा. शिवाजी मोहिते, उपाध्यक्ष जे. डी. पायमल, संचालक, मुख्याध्यापक आर. एस. पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.

‘संत शांतिप्रकाश’चा शंभर टक्के निकाल
गांधीनगर ः गांधीनगर (ता. करवीर) येथील संत शांतीप्रकाश हायस्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल लागला. तीन वर्षे असलेली १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. शाळेतील गुणानुक्रमे विद्यार्थी असे, श्रावणी राजकुमार पाटील (९५.२०), कृष्णा अनिलकुमार कृपलाणी (९२.४०), आशिष दीपक मुनानी (९१.८०). यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे अध्यक्ष रमेश तनवाणी, अनिल तनवाणी, मुख्याध्यापिका मजती आणि मिता नाडगौडा, शिक्षक, कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळाले.


शंभू महादेव विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
बांबवडे ः साळशी (ता. शाहूवाडी) येथील शंभू महादेव माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. अनुक्रमे- भक्ती बाबासाहेब पाटील (९०.८०), श्रेया प्रशांत पाटील (८८.८०), रेश्मा तानाजी पाटील (८७.४०) गुण प्राप्त केले. संस्थापक महादेवराव ज्ञानदेव पाटील. मुख्याध्यापक एस. एस. खोराटे. वर्ग शिक्षक- श्री. व्ही. बी. कांबळे आदींचे सहकार्य लाभले.

01682 प्रणव पाटील 01681 रिया पाटील
न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के
बांबवडे ः सावे (ता. शाहूवाडी) येथील न्यू इंग्लिश स्कूलचा माध्यमिक दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रथम प्रणव पाटील (९०.६०), रिया पाटील (९०.४०), प्रथमेश लोखंडे (८८.८०). एकूण १६ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीसह, तर सहा विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, उपाध्यक्ष वाय. डी. पाटील, मुख्याध्यापक ए. पी. पाटील, वर्गशिक्षक बी. बी. कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

‘संजीवन’ची १०० टक्केची परंपरा कायम
पन्हाळा ः येथील संजीवन नॉलेज सिटी अंतर्गत असलेल्या संजीवन विद्यानिकेतन या शिक्षण संकुलात दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. २७ वर्षांची ही शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी सर्व विद्यार्थ्यांनी कायम राखली. यशस्वी विद्यार्थ्यांत विशाल दत्तात्रय पाटील (९५.६०), आकाश दीनानाथ काळे (९३.७०), सुजन मोरे (९३). ६८ विद्यार्थ्यांत सर्वच्या सर्व विद्यार्थी डिस्टिंक्शन आणि ९० टक्केवर. सर्व विद्यार्थ्यांना संस्थापक पी.आर.भोसले, मुख्याध्यापक एन.आर. भोसले, के. के. पोवार यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.

‘आविष्कार’चा दुसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल
कोल्हापूर : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील आविष्कार इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावी परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला. सलग दुसऱ्या वर्षी शाळेचा शंभर टक्के निकाल लागल्याने पालकांनी शाळा व्यवस्थापनाचे कौतुक केले. शाळेचे अध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले, ‘विद्यार्थांना चांगले व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आविष्कार स्कूल सदैव तत्पर आहे. पुस्तकी ज्ञानासोबत त्यांना सामान्य ज्ञान मिळाले पाहिजे, यासाठी सर्व शिक्षक प्रयत्न करतात. आर्यन प्रवीण दळवी (९४.६०), विक्रांत महेश कोठावळे (९३.८०), श्रृतिका यशवंत दिवसे (९०.४०). या विद्यार्थांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना शाळेचे संस्थापक गणपतराव जाधव, अध्यक्ष अविनाश जाधव, सचिव स्नेहल जाधव, प्रिन्सिपल सुनंदा कदम व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

‘हेल्पर्स’च्या समर्थ विद्यालयाचे ३० विद्यार्थी उत्तीर्ण
गांधीनगर ः उचगाव (ता. करवीर) येथील हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड संस्थेच्या समर्थ विद्यालयाचे एकूण ३२ पैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १७ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य, ५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ४ विद्यार्थ्यांनी द्वितीय, तर ४ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी संपादन केली आहे. यशस्वी विद्यार्थी असे - विनोद दुर्गाप्रसाद दासरी (९२.२०), नेहा सुनील किट्टे (९१.८०), आदित्य अरविंद शिरगावे याने (८३), विशेष विद्यार्थ्यांत पंकज दिलीप कांबळे (७२.४), रोहित तानाजी मोहिते याने (६३.४०). सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा संचालक व संस्थेच्या विश्वस्त मंडळाने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
---------------
शाहू हायस्कूलचा निकाल शंभर टक्के
सानेगुरुजी वसाहत ः फुलेवाडी रिंग रोडवरील राजर्षी शाहू हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. परीक्षेसाठी एकूण ७१ विद्यार्थी बसले होते. प्रथमेश युवराज गमे याने ९२ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला. गुणानुक्रमे विद्यार्थी असे गायत्री सुनील कुलकर्णी (९१.४०), सुयश सचिन जगताप,(८८.८८), विक्रम प्रशांत मेरवा (८८,) स्वप्निता संतोष कस्तुरे (८७.२०). विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष सुनील साळोखे. मुख्याध्यापक बी. आर. पाटील यांचे प्रोत्साहन व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

पवार-पाटील विद्यालयाचा
१०० टक्के निकाल
शिरोली दुमाला : घानवडे (ता. करवीर) येथील गणपतराव बाबूराव पवार-पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा १० वीचा निकाल १०० टक्के लागला. गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी असे, पायल सर्जेराव पाटील (९२.८०), मीनाक्षी बाबूराव पाटील (८२.६०), अंकिता दीपक जाधव (८२), जोतिराम सावंत (८२). याशिवाय ७० टक्क्यांच्या वर १३ विद्यार्थी, तर ६० टक्क्यांच्या वर १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक माजी आमदार संपतराव पवार - पाटील, सचिव दीपक तोरस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.

भुये हायस्कूलचा निकाल १०० टक्के
भुये : भुये (ता. करवीर) ज्ञानू धोंडी पाटील हायस्कूल, भुये हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. सलग तीन वर्षांची १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. यशस्वी विद्यार्थी असे, वैष्णवी उत्तम पाटील (९४.६०), विश्वजित शिवाजी शिंदे (९४.२०), सानिया हैदर शेख (८६.८०). विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव भारत पाटील, मुख्याध्यापक पी. व्ही. लोहार यांचे प्रोत्साहन, तसेच वर्गशिक्षक पोवाळकर एस. एच. व सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

जान्हवी भोसले1708
समृद्धी पारखे1709
सृष्टी कारंडे-1707
‘सावर्डे-सडोली’चा शंभर टक्के निकाल
शिरोली दुमाला ः माध्यमिक विद्यालय सावर्डे-सडोलीचा निकाल शंभर टक्के लागला. गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असे, प्रथम - जान्हवी भोसले (९१.६०), द्वितीय- समृद्धी पारखे (९१.२०), तृतीय- सृष्टी कारंडे (९०.६०), ३३ विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य मिळाले. त्यांना संस्थाध्यक्ष शामराव नकाते, गणपतराव फाटक, मुख्याध्यापक सी. एस. पाटील, डी. व्ही. तोरस्कर, व्ही. एम. कदम, एस. आय. मुरतले, पी. पी. पाटील, एम. एन. भोसले, बी. पी. पाटील, एस. एन. केसरकर, पी. एस. म्हातुगडे, डी. डी. पाटील, टी. एस. म्हातुगडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68890 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top