
सरकारी कामात अडथळा
२६५८
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर
उजळाईवाडी ः कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये चुकीच्या दिशेने येणाऱ्या मद्यधुंद ट्रकचालकाने एका दुचाकीस्वारास जोराची धडक देत गंभीर जखमी केले. काल (ता. १६) दुपारी १२ दरम्यान हा अपघात झाला. अब्दुल रहमान बाळू पाटणकर (पकालेवाडी ता. राधानगरी) असे ट्रकचालकाचे नाव आहे. भरधाव ट्रक (एमएक्सएल ७९२५) ने दुचाकीवरून कामावर जाणाऱ्या आकाराम रघुनाथ देसाई (वय ३७, ऐनापूर ता. गडहिंग्लज) यांना धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ट्रकने दुचाकीस पंचवीस फुटापर्यंत फरफटत नेले. दुचाकीस्वार आकाराम गंभीर जखमी असून ट्रकचालक अब्दुल रहमान पाटणकर किरकोळ जखमी झाला आहे. ट्रकचालकाविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख करीत आहेत.
सरकारी कामात अडथळा; हॉटेल मालकावर गुन्हा
कोल्हापूर ः सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कळंबा रिंग रोड परिसरातील हॉटेल मालकावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दौलत राऊत असे संशयितांचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, बंडू तुकाराम पाटील हे वस्तू व सेवाकर कार्यालयात राज्यकर निरीक्षक म्हणून काम करतात. त्यांना वरिष्ठांनी हॉटेल बारच्या व्हॅटचे रजिस्ट्रेशनची (नोंदणी) पडताळणी करण्याचे अगर ती नसेल तर सूचना देण्याचे आदेश दिले होते. यामध्ये कळंबा रिंगरोड परिसरातील राऊत यांच्या हॉटेलचे नाव होते. पाटील बुधवारी (ता.१५) दुपारी राऊत यांच्या हॉटेलमध्ये व्हॅट नोंदणीची पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी राऊत यांनी अर्वाच्य भाषा वापरून फॉर्म फाडले आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद पाटील यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रार मागे घेण्यासाठी एकास मारहाण
इचलकरंजी : पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तिघांनी एकाला मारहाण केली. याप्रकरणी संदीप साळोखे, सुरज साळोखे, पवन (सर्व जवाहरनगर) यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबतची फिर्याद राहुल विठ्ठल सोनवणे (जयभीमनगर झोपडपट्टी) याने दिली. ही घटना डेक्कन रोडवरील सोनाली हॉटेलसमोर घडली. सोनवणे खाद्यतेल आणण्याकरिता डेक्कन चौकात आला होता. यावेळी संदीप व पवन यांनी त्याच्या दुचाकी आडवी मारली. तसेच त्याला थांबवून कानाखाली मारली. यापूर्वी आमच्या विरोधात पोलिसात दिलेली तक्रार मागे घे अशी धमकी दिली. सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार वरील तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
01529
मुरुक्टे परिसरात गव्यांचा कळप
पिंपळगाव ः बारवे - किल्ले भुदरगड मार्गावर मुरुक्टे (ता. भुदरगड) वनहद्दीत सहा गव्यांच्या कळपाने आज दर्शन दिले. अरण्यक्षेत्रात पाण्याची कमतरता असल्याने मुरुक्टे येथील शिवारात पाणी पिण्यासाठी गवे दररोज येऊ लागले आहेत. मुरुक्टे वनहद्दीत गव्यांचा कळप नागरिकांना दिसत आहे. या कळपात लहान वासरांचाही समावेश आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68919 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..