महापालिका सीबीएसई शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका सीबीएसई शाळा
महापालिका सीबीएसई शाळा

महापालिका सीबीएसई शाळा

sakal_logo
By

29968

महापलिकेतर्फे सीबीएसई
शाळांसाठी आराखडा करा

आमदार ऋतुराज पाटील यांच्या सूचना

कोल्हापूर, ता. १७ ः बृहन्ममुंबई, ठाणे आणि पुणे महापालिकांच्या धर्तीवर कोल्हापूर महापालिकेतर्फे ‘सीबीएसई’ शाळा सुरू करण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील व शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत महापलिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सीबीएसई शाळा सुरू करण्याबाबतच्या निकषांची माहिती घेऊन २४ जूनपर्यंत आराखडा सादर करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी दिल्या. बृहन्ममुंबई, ठाणे आणि पुणे महापालिकांतर्फे सीबीएसई शाळा चालवल्या जातात. आमदार पाटील व आमदार आसगावकर यांनी काही दिवसापूर्वी या शाळांना भेट दिली होती. तेथील शिक्षण पद्धतीची माहिती घेतल्यानंतर कोल्हापुरातील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने अशा शाळा सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या शहर आणि उपनगरात ५८ शाळा आहेत. त्यापैकी ४३ शाळा या मराठी असून १५ शाळा या सेमी इंग्रजी असल्याचे प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार यांनी सांगितले. सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा ओढा वाढताना दिसत आहे. कोल्हापुरातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनासुद्धा ‘सीबीएसई’सारख्या अभ्यासक्रमाचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही आमदार प्रा. आसगावकर यांनी यावेळी दिली. पुढील आठवड्यात महापालिकेच्या शाळांच्या इमारतीची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीला उपायुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, पर्यावेक्षक बाळासाहेब कांबळे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68922 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top