
शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणूकीचा बिगूल
(विद्यापीठाचा लोगो वापरावा)
अधिसभा निवडणुकीचे पडघम
पदवीधर नोंदणी ३० जूनपर्यंत; विकास आघाडी, विकास मंचकडून नोंदणीस प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विद्यापीठाने जाहिरात प्रसिद्ध करून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पदवीधर नोंदणी करण्याची सूचना केली आहे. ३० जूनपर्यंत पदवीधर नोंदणी करण्याची अंतिम मुदत आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेची मुदत ३१ ऑगस्टला संपणार आहे. तत्पूर्वी नवीन अधिसभा सदस्य येण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाचे पदवीधर मतदानाद्वारे प्रतिनिधी निवडतात. त्यासाठी ३० जून अखेर कोल्हापूर, सांगली सातारा येथील पदवीधरांची नोंदणी करावी लागणार आहे. जे पदवीधक नोंदणीकृत आहेत त्यांना पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करावी लागणार आहे. नव्याने नोंदणी करणाऱ्या पदवीधरांना दोन्ही नोंदणी एकाच वेळी करावी लागेल. यासाठी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. याबाबतची सर्व माहिती संकेतस्थळार उपलब्ध आहे.
कार्यकर्ते सक्रिय
शिवाजी विद्यापीठातील विकास आघाडी आणि विद्यापीठ विकास मंच या दोन्ही गटांनी पदवीधर नोंदणीस प्रारंभ केला आहे. समविचारी संघटना, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या माध्यमातून पदवीधर नोंदणी करण्यास प्रारंभ केला आहे.
अशी असेल अधिसभा (आकडे प्रतिनिधींचे)
महाविद्यालयीन शिक्षक १०, नोंदणीकृत पदवीधर १०, प्राचार्य १०, संस्थाचालक ६, शिक्षकेतर कर्मचारी १, विद्यापीठ अधिविभाग, प्रशासन कर्मचारी १, विद्यापीठ प्राध्यापक ३, राज्यपाल नियुक्त प्रतिनिधी १०, विधान परिषद २, विधानसभा १, स्थानिक स्वराज्य संस्था १.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68940 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..