नाले सफाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाले सफाई
नाले सफाई

नाले सफाई

sakal_logo
By

लक्ष आहे ‘सकाळ’चे
- लोगो
व आवाहन चौकट

30014

रंकाळ्याच्या सांडव्यात झाडेझुडपे
---
तलावाचे पाणी तुंबण्याचा धोका; पुन्हा भिंतीवरून पाणी ओसंडणार?
कोल्हापूर, ता. १७ ः सांडव्यातून पाणी पुढे न गेल्याने रंकाळा तलाव ओसंडून वाहिल्याचे शहरवासीयांनी अनुभवले आहे. यंदाही त्या सांडव्यात अगदी जेमतेम स्वच्छता करण्यात आली. या‍त झाडे-झुडुपे ‘जैसे थे’ असून, पुन्हा रंकाळ्याचे पाणी तुंबण्याचा धोका आहे. दरम्यान, ‘आम्हाला पूर नको’ अभियानाच्या कार्यकर्त्यांनी परीख पूल, कोटितीर्थ नाल्यांची पाहणी केली.
रंकाळ्याच्या पश्‍चिमेस असलेला सांडवा दरवर्षी पावसाळ्यापूर्वी स्वच्छ केला जातो. तलाव ओसंडून वाहिल्यास मोठा धोका आहे. रंकाळ्यातील पाणी वाहून जाण्यासाठी तलावात चर खोदली आहे. तसेच, सांडव्याला बांधकाम करून घेतले. पण, यंदा किरकोळ स्वच्छता केली आहे. बांधकाम केलेल्या सांडव्यात झाडे-झुडपे ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे रंकाळ्यातील पाणी सांडव्यातून वाहणे बंद होऊन पुन्हा भिंतीवरून ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.
परीख पूल ते साईक्स एक्स्टेंशन दरम्यानचा नाला काही ठिकाणी तुंबलेला होता. अशी परिस्थिती असल्यास परीख पुलात व साईक्स एक्स्टेंशनमध्ये किरकोळ पावसातही पाणी तुंबणारच, असे अभियानाच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यानंतर यादवनगरातून उद्यमनगर, कोटितीर्थ मार्केट दुकान गाळ्यापासून एमजे मार्केटच्या नाल्यात मिळणाऱ्या नाल्याची यापूर्वी कधी सफाई झालीच नसल्याने तिथे तुंबणारे पाणी परिसरातील कारखान्यांत, दुकानांत शिरते. तेथील नालाच गायब झाला आहे. महापालिका स्वच्छता करीत असल्याचे सांगत आहे, पण आमचा विश्वास नाही. उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी साफ केलेल्या नाल्यांची यादी द्या, आपण पाहणी करू, असे ॲड. बाबा इंदुलकर यांनी सांगितले आहे.


प्रतिक्रिया
रंकाळ्याचा सांडवा स्वच्छ केलेला नाही. घाणीचे साम्राज्य असून, डासांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी किरकोळ स्वच्छता केली.
- अमर पाटील, रंकाळा

गेल्या वर्षी पूर येऊन गेल्यावर किमान दोन-तीन महिन्यांतून एकदा नालेसफाई व्हायला हवी होती. तसेच, नागरिकही प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या जाता-येता भिरकावतात. त्यामुळे पाणी वाहत नाही, हे लक्षात का येत नाही? प्रशासनाने काम करायलाच हवे, जबाबदार नागरिक म्हणून आपण फक्त पाहतच राहायचे का?
- ऐश्वर्या बेहेरे, मुक्त सैनिक वसाहत

भागातील नालेसफाई झालेली नाही. नाल्यांत ड्रेनेज सोडला आहे. नुकत्याच झालेल्या पावसात गटारीतील पाणी दारापर्यंत आले होते. डासांचा प्रादुर्भाव झाला आहे.
- प्रदीप भांबुरे, रेसकोर्स नाका

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68942 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top