
मोबाईल
३००४०,४१
शंभरावर मोबाईलचा शोध
सायबर पोलिसांचे यश; संबधितांनी मानले पोलिसांचे आभार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः हप्त्याने खरेदी केलेला किमती मोबाईल गहाळ झाला. तो पुन्हा मिळेल याची शाश्वती नव्हती. मात्र, पोलिसांनी तो परत मिळवून दिला. त्यांचे आभार मानायला आमच्याकडे शब्दच नाहीत. अशा प्रतिक्रियांचा वर्षाव सायबर पोलिस ठाण्यावर आज झाला. निमित्त होतं गेल्या १५ दिवसांत गहाळ झालेले ११७ मोबाईल संच शोधून काढण्याच्या मोहिमेचे.
जिल्ह्यात २०१९ पासून अनेक नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हे मोबाईल शोधण्याचे आदेश दिले. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यामार्फत १५ दिवसांत विशेष मोहीम राबवली गेली. तांत्रिक तपास करत त्यांनी ११ लाख रुपये किमतीचे ११७ मोबाईल शोधले. त्याचे मालक शोधून आवश्यक कागदपत्राची पडताळणी करून आज ते संच त्यांना परत केले. चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा परत मिळाल्याचा आनंद संबंधितांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अशी मोहीम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.
ही मोहीम पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे, तानाजी सावंत, उपनिरीक्षक कोमल पाटील, अंमलदार अमर वासुदेव, सागर माळवे, रवींद्र पाटील, महादेव गुरव, सुरेश राठोड, सुधीर पाटील, अजय सावंत, सचिन बेंडखळे, विनायक बाबर, प्रदीप दिलीप पोवार, रवींद्र गाडेकर, विशाल पाटील, सुहास पाटील, संगीता खोत, पूनम पाटील, रेणुका जाधव हे सहभागी झाले होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68962 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..