ब्रिज खेळ कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रिज खेळ कार्यशाळा
ब्रिज खेळ कार्यशाळा

ब्रिज खेळ कार्यशाळा

sakal_logo
By

ब्रिज असोसिएशनतर्फे कार्यशाळा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा ब्रिज असोसिएशनतर्फे ब्रिज कार्यशाळा झाली. पूर्वी कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असणारा हा खेळ काही वर्षांनी कमी कमी होत गेला. हा खेळ परत नव्या जोमाने खेळावा यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. जिल्हा ब्रिज असोसिएशन आयोजित कार्यशाळेत कोल्हापूरसह ठाणे, मुंबई येथीलही खेळाडू सहभागी झाले होते. या वेळी दक्षिणदास यांनी मार्गदर्शन केले. असोसिएशनचे आनंद माने, डॉ. अजित चांदोलकर, डॉ. प्रतिभा खरे यांनी योगदान दिले. कार्यशाळेमुळे नवीन व उत्तम खेळाडू तयार होण्यास मदतच होईल, असा विश्वास असोसिएशनने व्यक्त केला.

कराटे स्पर्धेत कमला कॉलेजचे यश
कोल्हापर : ओपन इंटरनॅशनल ज्युनिअर कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत कमला कॉलेजच्या विद्यार्थिनींनी यश मिळवले. स्वाती मानेने सुवर्ण तर प्रियांका करवळ हिने कास्यपदकाची कमाई केली. दोन्ही खेळाडूंना ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच कॉलेजच्या शारीरिक शिक्षण संचालिका ज्योती गावडे, क्रीडा शिक्षक रघुनाथ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

सागर पाटील जलतरण
तलावाच्या खेळाडूंचे यश

कोल्हापूर,ता . १७ : राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये सागर पाटील जलतरण तलावाच्या खेळाडूंनी यश संपादन केले. रयत शिक्षण संस्था संचालित राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या सागर पाटील जलतरण तलावाचा संघ स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. स्पर्धेत कृष्णा शेळके हिने १७ वर्षाखालील वयोगटात २०० मीटर बटरफ्लाय प्रकारामध्ये रौप्यपदक पटकावले. तिची भुवनेश्वर (ओरिसा) येथे होणाऱ्या ४८ व्या ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज एन. पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डॉ. एम. बी. शेख, जनरल बॉडी सदस्य व जलतरण तलावाचे सचिव विक्रांत पाटील, डॉ. विकास पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार, उपप्राचार्य डॉ. के. व्ही. गायकवाड, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्रा. जी. एम. लवंगारे, डॉ. सविता माजगावकर आदींनी शुभेच्छा दिल्या.


जुलै, ऑगस्टमध्ये
विफा वूमन्स फुटबॉल लीग
कोल्हापूर : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे जुलै व ऑगस्टमध्ये विफा वूमन्स फुटबॉल लिगचे आयोजन केले आहे. लिगसाठी कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनतर्फे महिला फुटबॉल संघ सहभागी होणार असून महिला खेळाडूंची नोंदणीला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक महिला फुटबॉल संघाने के.एस.ए.कडे २० जून दुपारी ४ पर्यंत नोंदणी करावी असे ‘केएसए‘ने कळविले आहे.

कुसाळे शूटिंग अॅकॅडमीचे यश 
कोल्हापूर : कॅप्टन एस.जे.इझीकेल मेमोरीअल महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूरच्या जे.बी.कुसाळे शूटिंग अॅकॅडमीच्या नेमबाजांनी यश मिळवले. ॲकॅडमीच्या खेळाडूंनी १२ पदके मिळवली. सहभागी स्पर्धकांमधील १५ नेमबाज वेस्ट झोन व ऑल इंडिया जी. व्ही. माळवणकर या दोन स्पर्धेत भाग घेण्यास पात्र झाले. यात अथर्व आंग्रे, सुमेद सावंत, रजत माळी, यशवंतसिह आचरेकर, जकिया शिकलगार, रसिका कुसाळे, ऐश्वर्या पाटील, अंकेश आमिन, सानिया साठे, बालाजी नलवडे, ईशा कुंभार, अथर्व कुंभार, श्रीराज पवार, लावण्या नलवडे, समृद्धी हजारे यांचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68974 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top