स्टार्टअप स्टोरी - स्विमिंग पूल एक्सपर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टार्टअप स्टोरी - स्विमिंग पूल एक्सपर्ट
स्टार्टअप स्टोरी - स्विमिंग पूल एक्सपर्ट

स्टार्टअप स्टोरी - स्विमिंग पूल एक्सपर्ट

sakal_logo
By

30424
‘स्विमिंग पूल एक्सपर्ट’ असलेले अजय कांबळे, प्रसाद वैद्य

दोस्ती स्विमिंगपूल एक्सपर्टची

अजय-प्रसादची मलेशिया, मालदिवपर्यंत झेप-शिक्षणाचा अभाव तरीही जिद्द, चिकाटी

लुमाकांत नलवडे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः पंचतारांकित हॉटेल व्हिटर पॅलेसमध्ये स्विमिंग पूल येथे दुरुस्ती आणि जीवरक्षक म्हणून अजय कांबळे काम करत होता. त्याच हॉटेलमध्ये प्रसाद वैद्य याचे गिफ्ट शॉप होते. दोघांची दोस्ती जमली होती. पुढे स्विमिंग पुलाचे काम करतानाच त्यांना स्वतःचा व्यवसाय करावा, असे वाटत होते. याच दरम्यान अजयकडे पूलची देखभाल दुरुस्तीसह त्यासाठी आवश्‍यक केमिकलबद्दल विचारणाही होत होती. मात्र त्याला मार्केटिंग जमत नव्हते म्हणून प्रसादने साथ दिली.
दोघांनी केमिकल पुरविण्यापासून सुरुवात केली आणि आता त्यांनी मलेशिया, मालदिवपर्यंत झेप घेतली. ‘स्विमिंग पूल एक्सपर्ट’ म्हणून त्यांची ओळख या क्षेत्रात होत आहे.
इच्छाशक्तीच्या बळावर अजय कांबळे आणि प्रसाद वैद्य यांच्याकडून त्यांचा स्टार्टअप सुरू झाला. प्रसादने बी.कॉमची पदवी घेतली. अजय तर कशीबशी दहावी गाठली. त्यांच्याकडे या क्षेत्रातील ज्ञान नव्हते तरीही परदेशापर्यंत त्यांच्या डंका वाजू लागला आहे.
अजय स्विमिंग पूलची देखभाल पाहतानाच आमच्याकडील स्विमिंग पुलाची देखभाल दुरुस्ती करणार काय? आवश्‍यक केमिकल पुरवणार काय? अशीही विचारणा होत होती. तो बोलका नसल्यामुळे त्याला संधीच कळत नव्हती. मात्र मित्र प्रसाद याने पुढाकार घेतला. त्याने मार्केटिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला. पुण्यातून केमिकल आणून ते कोल्हापुरात देण्याचे काम सुरू झाले. पाहता पाहता त्यांना नवीन स्विमिंग पूल उभारण्याची संधी मिळाली. त्यांनी ती घेतली आणि पुण्यातील नीलेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनातून ती पूर्णही केली.
व्हिक्टर पॅलेसमध्ये काम सुरू असतानाच त्यांचा ‘साईड बिझनेस’ सुरू झाला. मात्र कालांतराने हॉटेलच बंद झाले आणि दोघांनीही या ‘साईड बिझनेस’कडे स्टार्टअप म्हणून पाहिले. दोघांनीही झोकून दिले.
आंबा, सांगली, मिरज, इचलकरंजी, कराड, चिपळून, रत्‍नागिरी, निपाणीपर्यंत त्यांनी आजपर्यंत ७५ स्विमिंग पूलची उभारणी केली. कोल्हापुरात मोठ्या क्लबचीही देखभाल दुरुस्ती पाहतात. आंबा येथील पर्यटनस्थळाच्या फार्म हाऊसमध्ये नव्याने पूल उभा केले, काही बंद पडलेले पुन्हा सुरू केले. वीस वर्षांची अजय-प्रसादची मैत्री आता व्यवसायात उत्तुंग झेप घेत आहे.


रामानंदनगरात राहणारा अजय आणि आयटीआय येथील हनुमान नगरात राहणारा प्रसाद दोघांनीही त्यांची कामे वाटून घेतली आहेत. अजय प्रत्यक्षात देखभाल पाहतो, तर प्रसाद मार्केटिंग आणि इतर कामे पाहतो. त्यातून त्यांना मलेशिया आणि मालदिवपर्यंत जाऊन काम करण्याची संधी मिळाली. चिकाटी आणि जिद्द यातच श्री. शुक्ला यांनी केलेले सहकार्य केल्यामुळेच आज स्विमिंग पूल एक्सपर्ट म्हणून ओळख होत असल्याचे दोघांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
---------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68984 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top