
हेल्पर्स- दहावी यश
30043
30042
30044
प्रतिकूल परिस्थितीवर
जिद्दीने मात करत ‘समर्थ’चे यश
कोल्हापूर, ता. १७ ः हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड संस्थेच्या उचगाव येथील समर्थ विद्यालयाच्या ३० विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत यश मिळवले.
शाळेतील १७ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य, ५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ४ विद्यार्थ्यांनी द्वितीय, तर ४ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी मिळवली आहे. परीक्षेवेळी गंभीर आजारांना सामोरे जावे लागल्याने दोन विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहू शकले नाहीत. विनोद दुर्गाप्रसाद दासरी याने ९२.२० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तो उत्तम खेळाडू आहे. नेहा सुनील किट्टे हिने ९१.८० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आदित्य अरविंद शिरगावे याने ८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. शारीरिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या अक्षम असणाऱ्या ८ विद्यार्थ्यांपैकी ३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पंकज दिलीप कांबळे याने ७२.४ टक्के गुण मिळवून विशेष विद्यार्थ्यांत प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचे अपंगत्व
सेरेब्रल पाल्सी असून तो व्हीलचेअर वापरतो. रोहित तानाजी मोहिते याने ६३.४० टक्के गुण मिळवत विशेष विद्यार्थ्यांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे. त्याचे
अपंगत्व सेरेब्रल पाल्सी आहे. रविना रमेश आजावेकर हिने ८० टक्के गुण मिळवले असून अर्जुन दयानंद वडर याने ७९.४ टक्के गुण मिळवले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69000 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..