
यिन संवाद
29998
यिन लोगो
कोल्हापूर : सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनियरिंगतर्फे आयोजित ''यिन संवाद'' कार्यक्रम प्रसंगी अभिनेत्री मुक्ता बर्वे,
अजित वाडीकर, ओमकार गोवर्धन, नंदू माधव, सुहास शिरसाट, रसिका चव्हाण.
प्रामाणिकपणे काम करा रिझल्ट चांगलाच
अभिनेत्री मुक्ता बर्वे ; भारती विद्यापीठ इंजिनियरिंग कॉलेजमध्ये ''यिन संवाद'' कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : "तुमचे कामावर प्रेम असेल तर तुम्ही अशक्य ते शक्य करू शकता, माझा चेहरा पाहून मला अभिनय चांगला येतो, अशी दाद अनेकांन दिली. अभिनेत्रीसाठी माझा चेहरा योग्य नसल्याचे स्पष्ट मतही मांडले. मी कामावर प्रेम करत राहिले आणि माझ्या अभिनयामुळे मी सर्वांनाच सुंदर दिसू लागले. तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहा. त्याचा रिझल्ट चांगलाच असेल," अशी आश्वासात्मक पेरणी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी आज येथे विद्यार्थ्यांत केली.
सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनियरिंगतर्फे आयोजित ''यिन संवाद'' कार्यक्रमात ती बोलत होती. प्राचार्य डॉ. विजय घोरपडे अध्यक्षस्थानी होते.
मुक्ता म्हणाली, ‘वीस वर्षे मी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. मला अभिनय चांगला येतो, याची खात्री होती. अनेकांनी अभिनयाबद्दल माझे कौतुकही केले. अभिनेत्रीसाठी मात्र माझा चेहरा योग्य नसल्याचे अनेकांनी सांगितले. त्याचा विचार मी केला नाही. माझे माझ्या कामावर प्रेम होते. पहिला चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी संपूर्ण कॅमेरा अभिनेता व अभिनेत्रीवर केंद्रित होता. त्यापूर्वी केलेल्या छोट्या मोठ्या कामातून माझी ओळख तयार होत होती. या चित्रपटाने ती अधिक गडद झाली. प्रामाणिकपणे काम करत राहिल्याने पुढे मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका मिळत राहिल्या."
दिग्दर्शक अजित वाडीकर, अभिनेता ओमकार गोवर्धन, नंदू माधव, सुहास शिरसाट, रसिका चव्हाण उपस्थित होते. विभागीय अधिकारी अवधूत गायकवाड, यिन मुख्यमंत्री पार्थ देसाई, यिन अध्यक्ष ओंकार सूर्यवंशी, उपाध्यक्ष यश शिर्के, प्रसाद जाधव, आकाश पाटील, गणेश येवले, उद्देश पाटील, स्वप्नील माने, रोहन स्वामी यांनी संयोजन केले.
.........
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69016 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..