
नूल परिसरातील संक्षिप्त बातम्या
29717
मुगळी : केदारी केरुजी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करताना नवलकुमार हालबागोळ. शेजारी उदय जोशी, बी. जी. स्वामी, रमेश आरबोळे, के. डी. धनवडे आदी.
मुगळीत निवृत्तीनिमित्त केरुजींचा सत्कार
नूल : महाराष्ट्रात स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये ४२ वर्षे लॅब असिस्टंट म्हणून काम करणारे एकमेव व्यक्ती म्हणजे केदारी केरुजी, असे मत गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांनी व्यक्त केले. मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे केदारी केरुजी यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. मजूर संघाचे माजी अध्यक्ष उदय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका व्ही. जी. लोहार यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते केदारी केरुजी दांपत्याचा आराम खुर्ची देऊन सत्कार झाला. सरपंच बी. जी. स्वामी, रमेश आरबोळे, के. डी. धनवडे, शिवप्रसाद तेली, तानाजी शेंडगे, लक्ष्मणराव पोवार, आर. के. पाटील, जे. वाय. कांबळे, संतोष तेली, सरपंच प्रभावती बागी, स्नेहल जिरगे, शिक्षक, ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते. कंदल यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69025 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..