सरकारी कामात अडथळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारी कामात अडथळा
सरकारी कामात अडथळा

सरकारी कामात अडथळा

sakal_logo
By

२९९६०
मोबाईल मालकाला परत
कोल्हापूर ः पार्वती टॉकीज सिग्नल चौकात राजारामपुरी ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी सविता पाटील यांना आज मोबाईल सापडला. त्यांनी अंमलदार देवा बल्लारी यांच्या मदतीने जवाहरनगरातील मीरासाहेब जमादार या मोबाईल मालकाचा तातडीने शोध घेतला. त्यांना पोलिस ठाण्यात बोलवून मोबाईल परत केला. जमादार यांनी पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

एकास दगडाने मारहाण
कोल्हापूर ः कचरा टाकण्याच्या कारणावरून एकास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघा अनोळखींवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये महिलेचाही समावेश आहे. हा प्रकार बुधवारी (ता. १५) रात्री हा प्रकार शाहूपुरीतील एका रुग्णालय परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

भरदिवसा तीन मोटारसायकलची चोरी
कोल्हापूर ः टिंबर मार्केट परिसर आणि टेंबे रोडवरून भरदिवसा चोरट्याने दोन मोटारसायकली चोरून नेल्या. हा प्रकार १२ जून रोजी घडला. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. दरम्यान १ जून रोजी मार्केट यार्ड परिसरातून चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.

01529
मुरुक्टे परिसरात गव्यांचा कळप
पिंपळगाव ः बारवे - किल्ले भुदरगड मार्गावर मुरुक्टे (ता. भुदरगड) वनहद्दीत सहा गव्यांच्या कळपाने आज दर्शन दिले. अरण्यक्षेत्रात पाण्याची कमतरता असल्याने मुरुक्टे येथील शिवारात पाणी पिण्यासाठी गवे दररोज येऊ लागले आहेत. मुरुक्टे वनहद्दीत गव्यांचा कळप नागरिकांना दिसत आहे. या कळपात लहान वासरांचाही समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69029 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top