निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

KOP22L30213
मारुती पाटील
कोल्हापूर : न्यू वाडदे वसाहत (गडमुडशिंगी) येथील मारुती गोपाळा पाटील (वय ९०) यांचे निधन झाले. हनुमान दूध संस्थेचे संचालक पांडुरंग पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २०) आहे.

१६८९
जयसिंगराव पाटील
बांबवडे ः भाडळे (ता. शाहूवाडी) येथील जयसिंगराव दत्ताजीराव पाटील (वय ८६) यांचे निधन झाले. जि.प. सदस्य, पंचायत समितीचे सभापती, बाजार समिती संचालक, वारणा दूध उत्पादक संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. २० वर्षे ते सरपंच होते. भाडळे गावचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचे योगदान आहे. त्यांच्या मागे भाऊ, पत्नी, मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २०) आहे.

३१२१
नामदेव पाटील
नंदगाव ः येथील नामदेव दादू पाटील (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी व बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

30059
अशोक हावळ
कोल्हापूर ः शिवाजी पार्क येथील अशोक रामचंद्र हावळ (वय ७२) यांचे निधन झाले. ते शाहू मिलमध्ये अकाउंटट म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

30148
पांडुरंग शिंदे
महागाव ः ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील पांडुरंग मारुती शिंदे (वय ८५) यांचे निधन झाले. वाहतूक नियंत्रक पदावरून ते निवृत्त झाले होते. जिल्हा बँक महागाव शाखेचे व्यवस्थापक सुनील शिंदे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) गडहिंग्लज येथे आहे.

१३३७
सजाक्का पाटील
रुकडी : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील सजाक्का वासुदेव पाटील (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २०) आहे.


३०१५
भाऊसाहेब तुरंबेकर
पुनाळ : कोतोली (ता. पन्हाळा) येथील भाऊसाहेब दत्तात्रय तुरंबेकर (वय ६०)यांचे निधन झाले. ते माजी कृषी पर्यवेक्षक होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे ,मुलगी, सुना, नातवडे असा परिवार आहे. रक्षाविर्सजन रविवार (ता. १९) आहे.

००९६५
केरूबाई जावळे
महागाव : येथील केरूबाई महादेव जावळे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २०) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69042 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top