
जाहीरात बातमी
30130
केंद्रीयमंत्री जरदोश यांची
रामसीना प्रकल्पाला भेट
कोल्हापूर, ता. १८ ः प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत बांधलेल्या व केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाकडून ‘गुणवत्ता प्रमाणपत्र (सर्टिफिकेट ऑफ मेरिट) २०२२’ पुरस्कार मिळालेल्या रामसीना ग्रुपच्या नागाळा पार्क येथील लोकनगरी गृहप्रकल्पाला केंद्रीय रेल्वे व टेक्सटाइल्स राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी भेट दिली. त्यांनी प्रकल्पातील रहिवाशांसी संवाद साधला. तसेच पर्यावरणपूरकरित्या बांधलेल्या या गृहप्रकल्पाचे कौतुक केले.
विशेष म्हणजे, मंत्री जरदोश यांनी ट्विट करत ‘अब’ अपने घर का सपना हुआ पुरा’ अशा शब्दात गृहप्रकल्पाविषयी गौरवोद्गार काढले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक व अधिकाऱ्यांच्यासोबत कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधलेल्या ‘लोकनगरी’गृहप्रकल्पला भेट दिली. येथील नागरिकांशी, लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यांचे सुखद अनुभव ऐकून मनस्वी आनंद झाला.’
मंत्री जरदोश यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना ही भेट दिली. खासदार धनंजय महाडिक, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपशहर अभियंता नारायण भोसले उपस्थित होते. रामसिना ग्रुपचे विकेश ओसवाल यांनी गृहप्रकल्पाची वैशिष्ट्ये सांगितले. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाकडून ‘गुणवत्ता प्रमाणपत्र’ पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. या गृहप्रकल्पात एकूण २५० सदनिका आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून पुरस्कारासाठी हा एकमेव प्रकल्प निवडल्याचे त्यांनी सांगताच मंत्र्यांनी रामसिना ग्रुपचे कौतुक केले. या वेळी अमित शहा, हरिता राठोड, रामसिना ग्रुपचे कर्मचारी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69145 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..