कोवाड परिसरातील दहावी निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड परिसरातील दहावी निकाल
कोवाड परिसरातील दहावी निकाल

कोवाड परिसरातील दहावी निकाल

sakal_logo
By

30134
सुयोग पाटील


‘श्रीराम’चा निकाल शंभर टक्के
कोवाड : येथील श्रीराम विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयात सुयोग अनिल पाटील याने ९६.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. संस्कृती सुरेश पाटील (९६.२०) द्वितीय व आर्यन सुनील कुंभार (९५.८०) टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. विद्यालयातील १९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अशोकराव देसाई, एन. व्ही. भोसले, वीरसिंह भोसले, प्राचार्य एस. एन. पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. टी. कदम, पर्यवेक्षक एन. एम. मनगुतकर, दत्तात्रय जोशी व शिक्षकांनी अभिनंदन केले.
-------------
तनुजा पाटील प्रथम
कोवाड : कागणी येथील व्ही. के. चव्हाण-पाटील विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला. विद्यालयात तनुजा दिगंबर पाटील (९२.६०) प्रथम, आरती गणपती पाटील (९१.८०) द्वितीय, सानिका दीपक देसाई (९१.२०) हिने तृतीय क्रमांक मिळविला. माजी मुख्याध्यापक ए. जे. देसाई, प्र. मुख्याध्यापक जी. आर. कांबळे, एम. ए. हगिदळे यांच्यासह शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
--------------
‘दुंडगेकर’चा निकाल १०० टक्के
कोवाड : मलतवाडी येथील प्रा. नामदेवराव दुंडगेकर हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. विद्यालयात तेजल सुबराव पाटील (९१.८०) प्रथम, ऋतुजा मारुती पाटील (८५.८०) द्वितीय, तर सानिका राजाराम तरवाळ (८४) हिने तृतीय क्रमांक मिळविला. मुख्याध्यापक सुनील हल्याळी व शिक्षकांनी अभिनंदन केले.
--------------
सोहम बसवाणी प्रथम
कोवाड : किणी येथील जयप्रकाश विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयात सोहम बसवाणी भांदुर्गे (९४ टक्के)प्रथम, प्रणाली नंदकुमार नांदुडकर (९३.८०) द्वितीय, तर वैष्णवी बाळाराम मनगुतकर (९३.६०) हिने तृतीय क्रमांक मिळविला. मुख्याध्यापक पी. जे. मोहनगेकर व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
--------------
ओमकार पाटील प्रथम
कोवाड : नागरदळे येथील नागनाथ हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयात ओमकार जानबा पाटील (८९.८०) प्रथम, जीवन शंकर पाटील (८६.८०) द्वितीय, तर विनीत महादेव पाटील (८६) यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
------------
दत्त हायस्कूलचा निकाल शंभर टक्के
कोवाड : राजगोळी बुद्रुक येथील दत्त हायस्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयात एकनाथ मारुती मनवाडकर (९०.८०) प्रथम, ओमकार अनिल जरळी (९०.६०) द्वितीय, तर मयुरी कुमार मोरे (८९.२०) हिने तृतीय क्रमांक मिळविला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69150 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top