निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

30163
एम. के. पाटील
कोल्हापूर : एम. के. पाटील (वय ७६) यांचे निधन झाले. ते मूळचे बेलवळे बुद्रुक (ता. कागल) गावचे. दूरदर्शनचे ते निवृत्त कॅमेरामन होत. दृकश्राव्य माध्यम नसतांना त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांचे चित्रिकरण केले. दूरदर्शनवरील महाराष्ट्र संगीतरत्न, ताक धिना धिन, ग्रामस्वच्छता अभियान, विकास गाथा, आमची माती आमची माणसं, कृषिदर्शन अशा अनेक कार्यक्रम आणि मालिकांचे चित्रिकरण केले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील कॅमेरामन सचिन पाटील यांचे ते वडील होत.

30214
अर्चना रोहिले
कळे ः मरळी (ता. पन्हाळा) येथील अर्चना युवराज रोहिले (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. शिवपार्वती महिला दूध संस्थेच्या त्या संचालिका होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

01576
जयसिंगराव साबळे
नानीबाई चिखली ः खडकेवाडा (ता. कागल) येथील माजी सैनिक जयसिंगराव दादोबा साबळे (वय ८०) यांचे निधन झाले. ग्रामपंचायत सदस्य योगेश साबळे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार (ता. २०) आहे.

६८०३
खंडू जाधव
घुणकी : बिरदेवनगर (पारगाव) येथील खंडू प्रभाकर जाधव (वय ३०) यांचे निधन झाले. नवे पारगाव ग्रामपंचायतचे कर्मचारी प्रभाकर जाधव यांचे ते चिरंजिव होत. त्याच्या मागे आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २०) आहे.

30161
नंदकुमार ठोंबरे
कोल्हापूर : नंदकुमार नरहर ठोंबरे यांचे गगनबावडा या ठिकाणी अपघाती निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. 19) आहे.

30168
विजय माने
कोल्हापूर : विजय जयसिंग माने यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

30171
वसंत कांबळे
कोल्हापूर : यमगे (ता. कागल) येथील वसंत राजाराम कांबळे (वय ५९) यांचे निधन झाले. राजर्षी छत्रपती शाहू जन्मस्थळाचे व्यवस्थापक उत्तम कांबळे यांचे ते भाऊ होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

१५३१
देवाप्पा कांबळे
पिंपळगाव ः मुरुक्टे (ता. भुदरगड) येथील देवाप्पा रामा कांबळे (वय ८०) यांचे निधन झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69181 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top