
यशोलौकिकाचे शिलेदार
30183
श्वेता बाळेगुंद्री
शिष्यवृत्ती मिळवून श्वेताने
मिळवले ९१. ८० टक्के गुण
कोल्हापूर, ता. १९ ः प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रमणमळा येथील श्वेता बाळेगुंद्री हिने यशाला गवसणी घातली. उषाराजे हायस्कूलची विद्यार्थिनी असलेल्या श्वेताने दहावी परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवले. श्वेता मुळची कर्नाटकातील. वडील गंवडीकाम करतात. वडिलांच्या कामासाठी कुटुंब कोल्हापुरात येऊन भाडेकरू म्हणून सध्या रमणमळा परिसरात राहतात. आठवीत असताना तिने एनएनएलची बाह्य परीक्षा दिली होती. यात तिने घवघवीत यश मिळवले. त्यामुळे तिला चार वर्षांची स्कॉलरशिप मिळाली. या स्कॉलरशिपच्या बळावरच तिने दहावीतील आर्थिक भार पेलला. तिच्या या यशात वर्गशिक्षक एस. व्ही. चौगुले यांच्यासोबत आई - वडिलांचे मार्गदर्शन मिळाल्याचे ती सांगते.
--
30216
प्रतिकूल परिस्थितीवर मात
करत सुरेखाची यशाला गवसणी
कोल्हापूर ः सुसंस्कार हायस्कूल, कदमवाडी येथील विद्यार्थिंनी सुरेखा बाबासो कस्तुरे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत (94.00 टक्के) गुण मिळविले. सुरेखाचे वडील मार्केट यार्डमध्ये काच कारख्यानात कामगार म्हणून काम करतात. तर आई धुणी भांडी करते. सुरेखाला तीन बहिणी असून, त्याही प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आहेत. कोणतीही खासगी शिकवणी न घेता सुरेखाने इयत्ता दहावीमध्ये यशाला गवसणी घातली. तिच्या या यशात आई - वडिलांसोबत शिक्षकांचे मोठे पाठबळ मिळाल्याचे ती सांगते.
--
३०२४४
आजी-आजोबांच्या पाठबळावर
श्रद्धाने केली दहावी परीक्षा सर
कोल्हापूर ः शा. कृ. पंत वालावकर हायस्कूलच्या श्रद्धा अजित लंबे हिने दहावी परीक्षेत ८६.२० टक्के गुण मिळवत यशाची पायरी चढली आहे. सहावीत असताना वडिलांचे निधन झाले. तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आजी, आजोबांकडे आली. त्यांनीही म्हशींच्या पालनातून श्रद्धाला पाठबळ द्यायचे ठरवले. श्रद्धानेही परिस्थितीची जाणीव ठेवत अभ्यास केला. कोणतीही खासगी शिकवणी नाही, फक्त शाळेतील मार्गदर्शनाच्या बळावर अभ्यासात सातत्य ठेवले. नर्सिंग किंवा फार्मसी क्षेत्रात तिला करिअर करायचे असून, पुढे ती या क्षेत्रातीलच शिक्षण घेणार असल्याचे तिने सांगितले.
--
३०२४५
गणेशमूर्ती बनवत अनुजने
दिला दहावीतील यशाला आकार
कोल्हापूर ः अनुज कुंभार या शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांने दहावी परिक्षेत ८१.४० टक्के गुण मिळवले. वडील दुसऱ्या कुंभारांकडे कुंभार काम करतात. दिवसभराच्या मोलमजुरीनंतरच घरखर्च भागवता येतो, अशी परिस्थिती. आई गृहिणी आहे. अनुजही वडिलांना गणेशमूर्ती बनविण्यात मदत करतो. त्याच वेळी अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही, याचीही काळजी घेतो. कठीण परिस्थितीवर मात करत अनुजने मिळवलेले हे यश त्यांच्या कुटुंबीयांच्या आयुष्यात सुखाचे क्षण घेऊन आले आहे.
--
२०२५०
परप्रातीय असूनही मराठीशी नाळ
जोडत अंजलीने मिळवले यश
कोल्हापूर ः अंजली अनिलकुमार प्रजापती ही मुळची उत्तर प्रदेशमधील. वडिलांच्या स्लायडिंग खिडक्या बनविण्याच्या कामासाठी कोल्हापुरात ती आठवीनंतर स्थायिक झाली. मराठीचा गंध नाही. शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मराठी शिकली. घरची परिस्थिती तशी बेताचीच. याही परिस्थितीत मराठीशी नाळ जोडत तिने दहावी परीक्षेत ८५.४० टक्के गुण मिळवले. आता मराठी लिहिण्या - बोलण्यासोबतच मराठी विषयातही तिने चांगले गुण प्राप्त केले आहेत.
-
30116
सेल्समनच्या मुलाने दिला
वडिलांच्या धडपडीला न्याय
कोल्हापूर : वडील नंदकुमार कोळेकर शनिवार पेठ मेडिकलच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करतात. आपल्याप्रमाणे आपल्या मुलाच्या वाट्याला सेल्समनच्या वेदना येऊ नयेत, मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून महाद्वार रोडवरील इंदिरा गांधी विद्यानिकेतन शाळेची निवड केली. आपल्या मुलांचे आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी धडपड सुरू आहे. त्या धडपडीला न्याय देण्याचे काम आणि वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत सार्थक कोळेकर याने १० वी परीक्षेत ८८.८० टक्के गुण मिळवत कष्टाचे चीज केले. वडील तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा गाडा सांभाळत मुलांच्या शिक्षणाकडे कधी दुर्लक्ष न करता मुलांच्या भविष्यासाठी धडपडतात. आई सुरेखा घरकामाबरोबर मुलांच्या शिक्षणाला हातभार लावते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69185 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..