पाऊस-पाण्याचे नो टेन्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस-पाण्याचे नो टेन्शन
पाऊस-पाण्याचे नो टेन्शन

पाऊस-पाण्याचे नो टेन्शन

sakal_logo
By

पाऊस लांबला तरी नो टेंन्शन!
सर्वच धरणात पुरेसा साठा; परिस्थिती पाहून बंधारे पुन्हा अडवणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ - पाऊस झाला नाही तरीही २५ जुलैपर्यंत पिण्यासाठी आणि शेतीला कोणत्याही परिस्थितीत पाणी कमी पडणार नाही, अशी स्थिती आजही आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. किमान २५ जुलैपर्यंत पावसाची वाट पाहिली जाणार आहे. त्यानंतर पंचगंगा आणि भोगावती नदीवरील काढलेले बंधारे पुन्हा घालण्यात येणार आहे. त्यामुळे पाऊस झाला नाही म्हणून चिंतेचे कारण नसल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येते.
कसबाबावडा येथील राजाराम बंधाऱ्यावरून आजही ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग असल्यामुळे पाऊस झाला नाही म्‍हणून शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. जिल्ह्यात १५ जूनपर्यंत धरणांतील पाणी कमी केले जाते. त्यानुसार पाणी कमी केले आहे, मात्र त्याचा परिणाम शेती आणि पिण्याच्या पाण्यावर होणार नाही. यावर्षी प्रत्यक्षात तीन जूननंतर मॉन्सून सुरू होईल म्हणून पाणी सोडले आहे. १९ जून येऊन ठेपला तरीही मॉन्सूनचा पाऊस कोल्हापुरात पोहोचला नाही. शेतीसाठी आणि पिण्यासाठी आवश्‍यक इकता पाणीसाठा आजही धरणात ठेवण्यात आला आहे. त्याचे नियोजन मागील पन्नास वर्षांतील आकडेवारीनुसार काढले आहे. सध्या धरणातील पाणी सोडले असले तरीही पंचगंगा आणि भोगावती नदीवर असलेले १४ बंधारे काढले आहेत. त्यामुळे धरणातील सोडलेले पाणी नृसिंहवाडीपर्यंत पोहोचते. त्यामुळे सध्या असलेल्या पिकांना कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले.

दोन दिवसांत बरसणार
साधारण २०, २१ आणि २२ जूनला पाऊस पडेल, असा अंदाज आहे. तो सर्वत्र पडला नाही, तरीही घाटमाथ्यावर पडेल, अशी स्थिती आहे. हा पाऊसच झाला नाही तर पुढे आणखी दहा ते बारा दिवस तो पडणार नाही. परिणामी अशा वेळी धरणातील पाण्याचा विसर्ग कमी होईल. १५ जुलैपर्यंत पाऊसच झाला नाही तर नदीतील काढलेले बंधारे पुन्हा घालण्यात येणार आहेत. त्यातून पुढे पावसाच्या पाण्याचे नियोजन होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69227 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top