
जिव्हाळा कॉलनीतील नाला झाला गटर
फोटो -30209
-
लोगो आणि आवाहन चौकट आज प्रसिद्ध झालेल्या टुडे पान १ वरून घ्यावा
-
नालेसफाईचा दिखावा उघड
जिव्हाळा कॉलनीत पर्दाफाश; ३० फुटांचा ओढा पुढे ७ फूट अरुंद झाल्याचे स्पष्ट
कोल्हापूर, ता. १८ ः रंकाळा ते फुलेवाडी येथे ३० फूट रुंदीचा असलेला ओढा पुढे उत्तरेश्वर पेठ ते जिव्हाळा कॉलनी परिसरात ६ ते ७ फूट इतका अरुंद झाला आहे. महापुराचे हे एक कारण आहे. जिव्हाळा कॉलनी परिसरात नालेसफाईचा दिखावा केल्याचे आज उघड झाले. तेथे आजची स्थिती पाहता पाणी थेट नदीत जाऊ शकत नाही. संपूर्ण ओढा गाळाने भरलेला असल्याचे पूरनियंत्रण कृती समितीच्या सदस्यांना दिसून आले.
सदस्यांनी आज लक्षतीर्थ वसाहतीजवळील जिव्हाळा कॉलनीमध्ये २० फूट उंचीचा महापूर आणि उत्तरेश्वर पेठेतील गवतमंडईत येणाऱ्या पुराची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भयानक स्थिती दिसली. नालेसफाई झालीच नसल्याने येथे महापालिकेचा पोलखोल झाला.
रंकाळा ते फुलेवाडी रस्त्यावर अंबाई टॅंक पाठीमागे असणाऱ्या रस्त्याकडील ओढा हा ३० फूट रुंद होता. पुढे उत्तरेश्वर पेठ ते जिव्हाळा कॉलनी रोडवरील पुलावर ६-७ फूट अरुंद झाल्यचे दिसून आले. संपूर्ण नाला गाळाने भरला आहे. येथे नाल्यात अकरा नळे आहेत. त्यापैकी एकच प्रवाहित आहे; बाकी सर्व बंद आहेत. त्यामुळे अंबाई टॅंक परिसर, हरिओम नगर, लक्षतीर्थ वसाहत, जिव्हाळा कॉलनी व काही प्रमाणात फुलेवाडीतील पाणी नदीत जाऊ शकत नाही. ते तुंबले आहे. जिव्हाळा कॉलनी व उत्तरेश्वर पेठेत पूर येण्याची कारणे येथे दिसून येतात. कोल्हापूर महापालिकेच्यावतीने येथे नालेसफाईचा फक्त दिखावा केल्याचे स्पष्ट झाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69247 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..