
निकाल १०
‘सुसंस्कार’चा निकाल ९८.९२ टक्के
कोल्हापूर ः येथील सुसंस्कार हायस्कूल इयत्ता दहावीचा निकाल ९८.९२ टक्के लागला. यशस्वी विद्यार्थी ः सुरेखा बाबासो कस्तुरे (९४.०० टक्के), अमृता भागोजी येडगे (९१.८० टक्के), अमृता अर्जुन बेळगावकर (९०.८० टक्के), ओंकार बबन जानकर (९०.८० टक्के), सिद्धेश बाळासो खपले (९०.२० टक्के), शुभलक्ष्मी शंकर तारदाळे (९०.०० टक्के). संस्थेचे संस्थापक एम.एच.मगदूम, मुख्याध्यापक विजय भोगम, शिक्षक शोभा कांबळे, शीतल भिऊंगडे, जकिया मगदूम, सागर पाटील, गजानन गुरव, सुहास खतकर, संजय कळके यांचे मार्गदर्शन लाभले.
-
३०००२, ३०००३,
३०००४, ३०००५, ३०००७, ३००१०
‘महावीरचा’ शंभर टक्के निकाल
कोल्हापूर : ‘महावीर एज्युकेशन सोसायटी’ संचालित सुर्वेनगर येथील ‘महावीर इंग्लिश स्कूल’चा १० वी निकाल शंभर टक्के लागला. सलग अठरा वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवली. या वर्षी केतकी पाटील, नुपर खंडकर यांनी शंभर टक्के गुण मिळवले. मुधरा दिवटे, लक्ष्मी पालकर यांना ९९ टक्के गुण मिळाले. आदित्य लंकाबरे याला ९८.२०, श्रीया शिंदे हिला ९८ टक्के गुण मिळाले. विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी, मानद सचिव महेश सामंत यांचे प्रोत्साहन लाभले. मुख्याध्यापक धनश्री व्हनागडे, दीपराणी म्हाळुंगेकर, वृषाली भागवत, महेजबीन बागवान, विद्या सरमळकर, सरोज पोवार, अनुराधा जगदाळे, प्रशांत कोळसे, मनोज पाटील, तृप्ती कांबळे, संगीता जगदाळे, अरुणा टिपुगडे, मयूर येलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
--
२९९३३
‘यशवंतराव भाऊराव पाटील’चे यश
कोल्हापूर ः कसबा बावड्यातील यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. सुझान इम्रान शेख हिने ९६ टक्के गुण मिळवले. तेजश्री अरुणकुमार समई हिने ९४.४० टक्के गुण मिळवले. प्रथमेश संदीप पाटील याने ९४.२० टक्के गुण मिळवले. त्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, संचालिका राजेश्री काकडे, रजिस्टार विश्वनाथ भोसले, मुख्याध्यापिका गौतमी पाटील यांचे सहकार्य लाभले.
--
३००३८, ३००३९, ३००३७
नागोजीराव पाटणकर शाळेचे यश
कोल्हापूर : या वर्षी झालेल्या १० वी परीक्षेत नागोजीराव पाटणकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. ७ विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले. ३६ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळाले. अनुषा पाटील (९६), वैभवी सुतार (९५), मधुरा जाधव (९४), विवेक मगदूम (९३), रिया किर्ती व स्वप्नील गडकर (९१) टक्के गुण मिळाले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एस. आर. गुरव, पर्यवेक्षक एम. डी. पुजारी, आर. ए. पाटणकर, विश्वस्त एन. एल. ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.
--
30023, 30024, 30025,
30028, 30029, 30031
आदर्श प्रशालेचा निकाल १०० टक्के
कोल्हापूर ः सरनाईक कॉलनी येथील आदर्श प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला. प्रशालेच्या संचिता सचिन पाटील (९४.६० टक्के), शंतनू संतोष सुतार - (९४.४० ), यश श्रीरंग कुंडले ( ९३), वैभवी किरण पाटील (९२.६०), आर्या अरुण पाटील ( ९१.८०), वैभवी राजाराम सुतार( ९१.६० ) या गुणवंतांनी यश संपादन केले.
संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, मुख्याध्यापक आर. वाय. पाटील, वर्गशिक्षक डी. पी. सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.
-
भुये हायस्कूलचा निकाल १०० टक्के
भुये : भुये (ता. करवीर) ज्ञानू धोंडी पाटील हायस्कूल भुये हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. सलग तीन वर्षांची १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. यशस्वी विद्यार्थी असे, वैष्णवी उत्तम पाटील (९४.६०), विश्वजित शिवाजी शिंदे (९४.२०), सानिया हैदर शेख (८६.८०). विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव भारत पाटील, मुख्याध्यापक पी. व्ही. लोहार यांचे प्रोत्साहन, वर्गशिक्षक पोवाळकर एस. एच. यांचे मार्गदर्शन लाभले.
-
केर्ली माध्यमिक विद्यालयाचे यश
भुये ः केर्ली माध्यमिक विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा राखली. यशस्वी विद्यार्थी- श्रद्धा सागर सुतार- ९४.६० टक्के,
आरती महेश सोळसे-९१.८०, सलोनी संजय पेडेकर- ८७.६०. त्यांना संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब चौगले, संस्था सचिव मोहन पाटील, मुख्याध्यापक अरुण भोसले, आर.बी. पाटील, डी.बी. पाटील, संगीता दुधाने, व्ही. डी. पाटील, मनीषा चौगले, डी. पी. कांबळे, टी. टी. पवार, ए. एल. भोसले, महेश चौगले, शिवाजी चौगले, रंजना शिंदे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69291 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..