गडहिंग्लज परिसरातील दहावीचा निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील दहावीचा निकाल
गडहिंग्लज परिसरातील दहावीचा निकाल

गडहिंग्लज परिसरातील दहावीचा निकाल

sakal_logo
By

३०२३२
तनुजा निकम, स्नेहल वड्राळे, धनश्री चिरमुरे

‘न्यू इंग्लिश’चा शंभर टक्के निकाल
दुगूनवाडी : चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. तनुजा निकम हिने ९५.६० टक्के गुणांसह शाळेत पहिला क्रमांक पटकावला. स्नेहल वड्राळे हिला ९४.६० टक्के तर धनश्री चिरमुरेला ९४.२० टक्के गुणांसह दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. सात विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक तर ३२ विद्यार्थ्यांनी ७५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले. मुख्याध्यापिका रशीदा शेख, सी.बी. निकम, वर्गशिक्षिका व्ही. व्ही. पाटील, एस. एम. माने, ए. एस. नाईक, मल्हार शिंदे, गजानन गोईलकर, योगेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
--------------
दीप स्कूलचा शंभर टक्के निकाल
गडहिंग्लज : दुंडगे येथील दीप इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. शाळेत ओमकार बसर्गे ९१, सपना कदम ८९,८०, प्रज्वली बोरगल्ली ८९.६०, राजशेखर चिक्कोडे ८८, रोहित पाटील ८८, विश्‍वजित कांबळे ८७.४० व अंकीता पाटील हिने ८७.४० टक्के गुण मिळवून गुणानुक्रमे प्रथम पाच क्रमांक पटकावले. संस्थाध्यक्षा प्रा. अनिता चौगुले, सचिव सोमाण्णा चौगुले, अनिल उंदरे यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापक अजित दावण, मुख्याध्यापिका विद्या कांबळे व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
--------------
महाराष्ट्र हायस्कूलचा ९८ टक्के निकाल
गडहिंग्लज : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील महाराष्ट्र हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८ टक्के निकाल लागला. शाळेत तनुजा मोहिते हिने ९३.६० टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला. श्रेया कसाळे व सिया पाटील यांनी प्रत्येकी ९२.४० गुण घेवून दुसरा तर रेश्मा गाडीवड्ड हिने ९२.२० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमंाक मिळविला. सायली मगदूम, संचिता माने, तनुजा पाटील यांनीही चांगले यश मिळविले. मुख्याध्यापक एन. एल. कांबळे, वर्गशिक्षक एम. ए. पाटील, सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले.
--------------
३०२३५
तनिष्का शिंदे, सौरभ फलटणे, यशराज पोवार

‘कौलगे’चा ९६.३० टक्के निकाल
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल ९६.३० टक्के लागला. २७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तनिष्का शिंदे (९३.८० टक्के), सौरभ फलटने (९३.२०), यशराज पोवार (९२.४०) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पा नडगदल्ली यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापिका सौ. एस. एस. इनामदार यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
-------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69311 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top