
सुकी मासळी, राजा अननस अन् टोमॅटो , तोतापुरी
30315
कोल्हापूर : पाऊस सुरु झाला की, सुके मासे घेण्यासाठी गर्दी होऊ लागते. (सर्व छायाचित्रे : अमोल सावंत)
सुकी मासळीला मागणी; ताज्या मासळीत घट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : यावर्षी अजूनही मॉन्सूची सुरवात नाही; मात्र कोकण परिसरातून येणाऱ्या ताज्या माशांची आवक मंदावली. याबरोबर नदी, तलावांतील मासेही मटण मार्केटमध्ये कमी दिसत आहेत; तरीही सुक्या मासळीला अधिक मागणी आलेली दिसते. वर्षभर ही सुकी मासळी मिळते; पण पाऊस सुरु झाला की, ताजे मासे मिळत नाही. अशावेळी विविध प्रकारची सुकी मासळी ही कसर भरुन काढते. ‘खारी मासळी’ म्हणून ती ओळखली जाते. सर्व वयोगटाला आवडणारी ही खारी मासळी चविला उत्कृष्ठ असते. माशांतील अनावश्यक भाग काढून, मीठ लावून, कडक उन्हात वाळविणे ही एक प्रक्रिया असते. त्यामुळे ही खारी मासळी तुलनेने महाग असते. अनेक लोक ही मासळी घेण्यासाठी या काळात मटण मार्केटमध्ये येतात. अर्धा किलो ते एक किलोपर्यंत ही मासळी घेतली जाती. ताजा मासा खाल्ल्याचा ‘फिल’ देतो, तो खारा मासा. घरामध्ये आणून मासा हा स्वच्छ धुतला जातो. माशांवरील मीठ पाण्याबरोबर विरघळून जाते. मग तो निवडून, भाजून केला जातो.
...
सुकी मासळीचे दर (प्रतिकिलो/नग)
घोलमा *४००
मोठा झिंगा *६००
दांडी सुकट *४००
मांदेली *२००
बोंबील *६००
बांगडा प्रति नग *२० रुपये
सुरमई *६००
पोपट मासा *६००
सोंडे *२०००
नदीचा झिंगा *१०० रुपयाला मापटे
चौकट
भिवंडी प्रसिद्ध
भिवंडी (जि. ठाणे) येथील खारबावच्या बाजारात सुके बोंबिलाची विक्री अधिक होते. सुकवलेली मांदेली, झिंगा, वाखटी, बांगडा, वाम, बोलार, पापलेट, अन्य प्रकारची सुकी मासळीही या बाजारात मिळते. कोकणांबरोबर अखंड महाराष्ट्रातून अनेक मासे व्यापारी सुकी मासळी घेण्यासाठी येतात. मासे खराब होऊ नये म्हणून मीठ लावून, माशांच्या मांसावर मीठ चोळले जाते. कडक उन्हात ते सुकविले जाते. मीठ चोळून सुकवलेली ही मासळीला मग ''खारा मासा '' म्हणून ओळखले जाते. सुकलेले मासे ठेवण्यासाठी विविध आकारांच्या टोपल्यांमध्ये मांडणी केली जाते. जेणेकरुन खवय्यांचे लक्ष वेधले जाईल. सुकी मासळी खराब होत नाही. परिणामी, साठा करून ठेवता जातो. हा साठा पावसाळ्याच्या काळात विक्रीसाठी आणला जातो.
कोट
हिवाळा ते उन्हाळा काळात रत्नागिरी, सिंधुदूर्ग भागातून सुकलेले मासे येतात; मात्र पाऊस सुरु होण्याआधी अलिबाग, ठाणे, महाड, रायगड आदी भागातून सुके मासे आणून ठेवले जातात. ताजी मासळी मिळत नाही, म्हणून सुक्या माशांना पावसाळ्याच्या काळात अधिक मागणी असते.
-शोएब शेख, व्यापारी
-----
30335
कोल्हापूर : नदीच्या माशांची आवक ही कमी दिसते आहे.
सर्वत्र दिसतो तो पानगाच...!
कोल्हापूर, ता. १९ : मटण मार्केटमध्ये दिसते ती नदीची मासळी. समुद्री माशांची आवक कमी झाली असली तरी नदी आणि तलावातील ‘कल्चर्ड फिश’मुळे असे मासे उपलब्ध झालेले दिसतात. जेव्हा समुद्री माशांची आवक कमी होते, तेव्हा अनेकजण नदीचे मासे घेण्यासाठी गर्दी करतात. कमी काटे असलेल्या नदीच्या मासळीलाच अधिक मागणी असते. यात पानगा ही कसर भरुन काढतो. पानग्यात मध्यभागी एक काटा असतो. तेल खूप असते. परिणामी, तो जिभेला चव देतो. लहान आकारापासून ते भला मोठ्या आकारापर्यंत पानगा उपलब्ध आहे.
नदीच्या माशांचे दर (प्रतिकिलो/नग)
कटला *२००
रोहू *१६०
पानगा *३२०
ैपालू *१६०
हैदराबादी टाकळी *१४०/१६०
टिलापिया *१२०
रावस *१६०
हैदराबादी रुपचंद *१४०/१८०
शिंगाळा *२४०
वॉम्ब *३२० रुपये नग
मरळ *३६०
तांबर *१६०
कानस *१४०
-------------------
30339
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीत अननसाची फळे असे लक्ष वेधून घेत आहेत.
आला रे आलाऽऽ राजा अननस आला...!
कोल्हापूर, ता. १९ : कोल्हापूरमध्ये दोन वेळेला अननस उपलब्ध होतात, ते म्हणजे उन्हाळा अन् पावसाळ्यात. आता जून महिना सुरू आहे. त्यामुळे राजा अननसाचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले आहे. प्रतिनग दहा ते ६० रुपयांपर्यंत (आकारमानानुसार) अननसाचे दर असून, ‘अननसाचा रायता’ करण्यासाठी ग्राहकांकडून मागणी आहे. भारतात आसाम, त्रिपुरा, केरळ, मिझोराम, आंध्रप्रदेश तसेच पश्चिम बंगाल भागात प्रामुख्याने लागवड केली जाते; मात्र मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातील शेतकरीसुद्धा अननसाची लागवड करत आहेत. केरळ, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये अननसाची १२ महिने लागवड केली जाते. कोल्हापूरला जे अननस येतात, ते कर्नाटकातील सिरशीमधून. अननसाची वर्षातून दोन वेळा लागवड करता येते. जसे की, पहिला टप्पा जानेवारी ते मार्च. दुसरा टप्पा मे ते जुलै दरम्यान असतो. दुसऱ्या बाजूस ज्या भागात मध्यम उबदार हवामान असते त्या भागात बारा महिने अननसाची लागवड करता येते. अननसाच्या क्वीन, मॉरिशियस, जायंट क्यू, रेड स्पॅनिश या प्रमुख जाती आहेत. राणी ही जात लवकर परिपक्व होते. जायंट क्यू जातीला परिपक्व होण्यासाठी उशीर लागतो. मॉरिशियस ही विदेशी जात आहे; तर लाल स्पॅनिश जातीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. कोल्हापूरमध्ये राणी अननस उन्हाळ्यात तर राजा अननस जूनमध्ये येते; पण चविला उत्कृष्ठ राजापेक्षा राणी अननसच चांगले, असे विक्रेते सांगतात. राजा अननस जरा जास्त आंबट तर राणीला आंबटपणा कमी अन् गोडपणा जास्त असतो. राणी अननसाचे दर ६०/८० रुपयांपर्यंत असतात.
...
30358
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीसह अन्य मार्केटमध्ये कांदा घेण्यासाठी अशी गर्दी दिसू लागली आहे.
हेळवी कांद्याला अधिक मागणी
कोल्हापूर, ता. १९ : मौसमी पाऊस सुरु होईल; मग कांदा घेण्यासाठी कशाला वारंवार मंडईत जा म्हणून कांदा घेण्यासाठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. प्रतवारीनुसार कांद्यांचे दर असून ५० रुपयाला चार किलो तर दहा रुपयाला दिड किलो कांदा विक्री सुरू आहे. अनेकजण दहापासून ते ५० किलोपर्यंत कांदे घेत आहेत. घरात आणून तो पसरवून टाकला की, टिकतो खूप दिवस. पावसाळ्यात कांद्याला कोंब येतात. कोंब आला तरी कोंबासहित कांदा जेवणामध्ये वापरला जातो.
फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपये)
लाल टोमॅटो *६०
जांभळे वांगे *४०
हिरवी वांगी *८०
दोडका *४०
ढब्बू मिरची *८०
देशी गवारी *८०
बंदरी गवारी *४०
कोबी *१०/२० रुपये प्रति नग (आकारमानानुसार) प्लॉवर *२०/३० रुपये प्रति नग
आल्ले *६०
भेंडी *४०
पडवळ *१०/२०/२५ रुपये प्रतिनग
पिकॅडो मिरची *२०
सुरणगड्डा *८०
्आळू गड्ढा *८०
लसूण *४०
हेळवी कांदा *५० रुपयाला चार किलो/दहा रुपयाला दीड किलो
इंदुरी बटाटा *२५/३०
देशी वाल *८०
लाल भोपळा *१०० रुपये नग
कोहळा *५० रुपये नग
कारले *४०
लाल बीट *१० रुपये दोन नग
मुळा *१० रुपये एक नग
कच्ची केळी *५० रुपये डझन
शेवगा शेंग *२० रुपयांना तीन शेंगा
तोंदली *४०
बिनीस *८०
स्वीट कॉर्न *१०
घोसावळे *४०
काटेभेंडी *८०
बेळगावी गाजर *४०
ऊसावरील शेंग *८०
लिंबू *१० रुपयाला १० नग
...
पालेभाज्यांचे दर (प्रतिपेंडी)
शेपू *१०
पोकळा *१०
तांदळी *१०
लाल माट *१०
आंबाडा *१०
मेथी *१५
आंबट चुका *१०
कांदापात *१०
कोथींबीर *१०
पालक *१०
...
सोने-चांदीचे दर (प्रतिकिलो/प्रति तोळा दर) (पुणे बाजारानुसार) (रविवारी सायंकाळी साडेपाच पर्यंतचा दर)
सोने *५२,५३५
चांदी *६०,९००
...
साखर (क्विंटलचा दर) मोठी साखर : ३७०० रुपये किलो (होलसेलप्रमाणे)
...
खाद्यतेलाचे दर (प्रतिकिलो/प्रति लिटर)
सरकी *१७८
सुर्यफुल *२१६
शेंगतेल *१९६
राईसब्रान *२२०
सोयाबीन *१७८
कॉर्न तेल *२३०
लाकडी घाणा करडई तेल *२९५
लाकडी घाणा सुर्यफुल तेल *२९५
तीळाचे तेल *२९०
साधे खोबरेल (केमिकलसहित) *२४०
प्रीमीयम एडिबल खोबरेल (खाद्यासाठी वापर) *३६०
कोट
लाकडाच्या घाणीपासून तयार होणाऱ्या तेलांना अलिकडे खूप मागणी वाढली आहे. असे तेल आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ठ असून अनेक लोक खास लाकडी घाणीचे तेल घेण्यासाठी आमच्याकडे येतात.
-श्रीतेज अथणे, खाद्यतेल व्यापारी
...
चिकनचे दर (प्रतिकिलो)
ीबॉयलर चिकन *१७८/१८०
भातासहित चिकन *२२०
जिवंत कोंबडी *१५०/१६०
स्किन काढलेले चिकन *२००
स्कीनसह चिकन *१८०
लेगपीस *३००
बोनलेस *३००
विंग्ज *१७८
ाााा썘┴
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69382 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..