
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
३०२३४
मुत्नाळ : बारावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत एस. डी. कॉलेजचे शिक्षक व कर्मचारी.
एस. डी. कॉलेजचा निकाल शंभर टक्के
गडहिंग्लज : मुत्नाळ येथील एस. डी. हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला. विज्ञान शाखेत आदिती निकम ९०.८३, शार्दूल पाटील ९०.५०, प्रज्वल पाटील ९०.१७, वल्लभ पाटील ८९.८३, रोहित रेपाळ ८९.३३, वाणिज्य शाखेत सुचित्रा पाटील ८६, दीपा हालगडगी ८५.८३, रोहिणी देसाई ८४.५०, राजश्री केपदाणी ८३.८३, मोनिका जाधव ८१.५० टक्के गुण मिळवून चांगले यश मिळविले. संस्थाध्यक्षा श्रीमती रत्नमाला घाळी, कार्याध्यक्ष डॉ सतीश घाळी यांचे प्रोत्साहन मिळाले. प्राचार्य, शिक्षक, वर्गशिक्षक, विभागप्रमुख, कर्मचार्याचे मार्गदर्शन मिळाले.
----------------
केंद्र सरकारविरोधात आज आंदोलन
गडहिंग्लज : राष्ट्रीय काँगे्रसचे नेते खासदार राहूल गांधी यांच्यावर खोटे आरोप करुन ईडीच्या गैरवापराद्वारे विरोधकांचे तोंड बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध काँगे्रसच्यावतीने उद्या (ता. २०) प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन शहराध्यक्ष बसवराज आजरी यांनी केले आहे.
----------------
३०२३३
सारिका जाधव, सोनाली शिंगाडे
बीएचएमएस परीक्षेत
जाधव, शिंगाडे प्रथम
गडहिंग्लज : ई. बी. गडकरी होमिओपॅथीक महाविद्यालयाचा निकाल जाहीर झाला. अंतिम वर्षात शिकणारी सोनाली शिंगाडे ही ६३.४६ टक्के तर तृतीय वर्षाच्या परीक्षेत सारिका जधव हिने ५८ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात पहिल्या आल्या. अंतिम वर्षाच्या परीक्षेत नेहा नाईक ६२.२० तर सूरज कदम याने ६२.०६ टक्के गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. तृतीय वर्षाच्या परीक्षेत सपना मदन हिने ६०.८३ तर तेजस्वी कातकर व सोनिया चिंचेवाडी यांनी प्रत्येकी ५९.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. प्राचार्य डॉ. आर. पी. डिसोझा यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचार्यांचे मार्गदर्शन मिळाले. अध्यक्ष सागर गडकरी यांच्यासह सर्व विश्वस्तांचे प्रोत्साहन मिळाले.
------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69452 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..