सांस्कृतिक कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांस्कृतिक कोल्हापूर
सांस्कृतिक कोल्हापूर

सांस्कृतिक कोल्हापूर

sakal_logo
By

लोगो- सांस्कृतिक कोल्हापूर
..........
30426
देवल क्लबतर्फे जुई धायगुडे-पांडे यांचे गायन
कोल्हापूर ः राष्ट्रीय संगीत नृत्य केंद्र (मुंबई) आणि गायन समाज देवल क्लबच्या सहसंयोजनाने श्रीमती जुई धायगुडे-पांडे यांच्या सायंकालीन मैफलीचे आयोजन शनिवारी (ता. २५) केले आहे. देवल क्लबच्या भांडारकर कलादालनात मैफल होणार असून सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.
जुई धायगुडे यांनी सरस्वतीबाई राणे, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या शिष्या सूरमणी शीला जोशी यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले आहे. जयपूर घराण्याच्या दुर्मिळ व अनवट रागांची तालीम त्यांनी डॉ. अरुण द्रविड यांच्याकडून घेतली असून ओंकारयुक्त आवाजाचा शुद्ध, निकोप लगाव, राग स्वरूपाची शिस्तबद्ध बढक, आकर्षक बोलताना व गुंतागुंतीची चपळ तानक्रिया ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांना महेश देसाई, सारंग कुलकर्णी यांची साथसंगत असेल.
...
30425
‘कलाप्रबोधिनी’च्या प्रदर्शनाला प्रतिसाद
कोल्हापूर, ता. २० ः शिवाजी विद्यापीठ संलग्न कलाप्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमधील इंटेरियर डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या कलाकृतीचे प्रदर्शन भालजी पेंढारकर केंद्रात झाले. प्रदर्शनाचे उद्‌घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी विश्वकर्मा विद्यापीठाचे उपसंचालक प्रा. प्रशांत आचार्य, प्रा. आकाश आलेगावकर, संस्थेचे अध्यक्ष विजय गजबर, प्राचार्या गीरिजा कुलकर्णी, विश्वस्त जयंत बेगमपुरी आदी उपस्थित होते.
प्रदर्शनात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेले विविध डिझाईन प्रोजेक्ट मांडले आहेत. ऑडिओ, व्हिडिओ प्रेझेंटेशनच्या माध्यमातून प्रा. प्रशांत आचार्य, प्रा. आकाश आलेगावकर यांनी विविध क्षेत्रांतील संधी तसेच उच्च शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जे विद्यार्थी बारावी पास झालेले आहेत आणि त्यांना इंटिरियर डिझाईनमध्ये करिअर करायचे आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन खूपच मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे सर्व पालक व विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांबाबत माहिती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. अदिती ललित हिने आभार मानले.
..........
30428
‘विरासत''तर्फे कस्तुरीचा प्रवास उलगडला
कोल्हापूर, ता. २० ः येथील सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवणाऱ्या विरासत फाउंडेशन आणि एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या संयुक्त विद्यमाने एव्हरेस्टवीर कस्तुरी सावेकरचा प्रवास उलगडला. कस्तुरीने नुकतीच जगातील उत्तुंग एव्हरेस्ट आणि अन्नपूर्णा अशी दोन शिखरे सर केली असून त्याबद्दल तिचा या वेळी सत्कारही झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते तिला गौरवले. या वेळी सुमारे दीड तासाहून अधिक काळ कस्तुरीची मुलाखत रंगली. त्यातून तिने केलेली तयारी आणि प्रत्यक्ष मोहिमेतील अनुभव आदी गोष्टींचा वेध घेतला गेला. या वेळी प्रसाद जमदग्नी, सर्जेराव मातूगडे, ज्येष्ठ पत्रकार चारुदत्त जोशी, विरासत फाउंडेशनच्या अध्यक्षा मीना पोतदार- ताशीलदार, शील्पा जोशी-पुसाळकर, रणजित बुगले आदी उपस्थित होते.
............
30541
‘रोटरी- मिडटाऊन''तर्फे व्याख्यान
कोल्हापूर, ता. २० ः आनंद, नम्रता, दातृत्व पंढरीची वारी शिकवते. जीवनाला समृद्ध करायचे असेल तर वारीशिवाय पर्याय नाही, असे मत प्रसिद्ध वक्ते आणि प्रवचनकार प्रकाश कदम यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ मिडटाउनच्या वतीने हॉटेल वृषाली येथे झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. ‘पंढरपूरची वारी जीवन सुखमय करी’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
पंढरीच्या वारीमध्ये दहा ते पंधरा लाखांचा समुदाय विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतो. इतक्या मोठ्या संख्येच्या समुदायासाठी पोलिसांची गरज नसते. येथे कसलीही धक्काबुक्की होत नाही. ‘माउली’ असे म्हणून हात जोडून नम्रतेची शिकवण वारी देऊन जाते, असेही श्री. कदम म्हणाले. स्वागत आणि प्रास्ताविक ‘रोटरी’च्या अध्यक्षा भारती नायक यांनी केले. अमर शिरवाडे यांनी आभार मानले. या वेळी ‘रोटरी’च्या वतीने गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. ‘रोटरी’च्या खजानिस सायली तगारे, अनिरुद्ध तगारे, अमोल देशपांडे, डॉ. प्रकाश संघवी, आकित शहा आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69566 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top