
पत्रकांसह काही बातम्या
29957
कोल्हापूर : वि. स. खांडेकर प्रशालेतील नववीतील विजरा विभुते, देवयानी कुंभार यांनी बारामती येथील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात ‘नदी प्रदुषण नियंत्रण’ या उपकरणाला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. मुख्याध्यापिका नेहा कानकेकर, पर्यवेक्षिक आर.बी.भोईल, विज्ञान शिक्षक रोहिणी फाले, पी. ए. कुलकर्णी, व्ही.पी.पवार, आंतरभारती शिक्षण मंडळाचे संचालक संग्राम वाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
२९९४४
कोल्हापूर : कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी उपस्थित मान्यवर.
बालकल्याण संस्थेतर्फे साहित्य वाटप
कोल्हापूर : कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेतर्फे १ ली ते १० वी वर्गातील ९०० मुले-मुलींना शालेय पुस्तक, वह्या, पेन वाटप केले.
श्रीमती विजयमाला चव्हाण यांच्या हस्ते वितरण झाले. संस्थेचे अध्यक्ष वैभव सावर्डेकर अध्यक्षस्थानी होते. ग्रेन मर्चंटस्चे अध्यक्ष अभयकुमार अथणे यांनी स्वागत केले. संजीव परीख, विजय कागले, सुरेश लिंबेकर, किरण तपकीरे, राजेंद्र लकडे, अमर क्षीरसागर, विवेक नष्टे, धन्यकुमार चव्हाण, सचिव रमेश पाटील, अशोक वडणगेकर आदी उपस्थित होते. रमेश पाटील यांनी सूत्रसंचलन केले; तर किरण तपकीरे यांनी आभार मानले.
२९९४९
कोल्हापूर : भास्करराव जाधव यांची जयंती निमित्त उपस्थित मान्यवर.
गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बँकेत
भास्करराव जाधव जयंती
कोल्हापूर : राजर्षि शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् को-ऑपरेटिव्ह बँकेत भास्करराव जाधव यांची जयंती झाली. भास्करराव जाधव यांच्या पुतळ्यास अध्यक्ष शशिकांत तिवले, उपाध्यक्ष रमेश घाटगे, संचालकांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. जाधव यांच्या विचारांचे जतन करुन बँकेची प्रगतीसाठी यापुढेही काम करीत राहणार आहे, असे अध्यक्ष श्री. तिवले यांनी सांगितले. उपाध्यक्ष रमेश घाटगे, संचालक रविंद्र पंदारे, मधुकर पाटील, अतुल जाधव, रोहित बांदिवडेकर, विलास कुरणे, सदानंद घाटगे, अजित पाटील, हेमा पाटील, मनुजा रेणके, संचालक संजय खोत, किशोर पोवार, अरविंद आयरे, तज्ज्ञ संचालक दिलीप मिरजे, विनायक कांबळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, मुख्य लेखापाल रुपेश पाटोळे आदी उपस्थित होते.
...
30505
कोल्हापूर : जायंटस् ग्रुप ऑफ कोल्हापूर सिटीतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रमोद शहा.
‘जायंट्स सिटीतर्फे साहित्य वाटप
कोल्हापूर : जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर सिटीतर्फे शालेय विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वितरण केले. शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला. यावर्षी सुमारे दोन लाख किंमतीचे गरजू साहित्य शालेय विद्यार्थ्यांना वाटप केले. केंद्रीय समिती सदस्य प्रमोद शहा, डॉ. सतीश बापट, अनिस मानी, रामनारायण उंटवाल, मंगला कुलकर्णी, माजी महापौर भूपाल शेटे, डॉ. शरदचंद्र दिवाण, रामदासजी रेवणकर, प्रकाश क्षीरसागर आदी उपस्थित होते. मोफत शालेय साहित्य वाटप योजनेचा लाभ १३ शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यवाह किशोर बेर्डे, उपाध्यक्ष सुभाष भाट, उपाध्यक्ष श्रेणिक पाटील, रखजानीस मिलिंद शहा, संचालक दीपक शहा, प्रकाश मोहिते, अय्याज बागवान, प्रभाकर पत्की, प्रभाकर नाईक आदींनी परिश्रम घेतले. ललित शहा, ज्ञानेश्वर डोईफोडे, सुधाकर पाटील, डॉ. रवींद्र पोर्लेकर, प्रकाश पुंगुरकर, मनोज पाटील, अश्विनी नाईक, प्राजक्ता पत्की आदी उपस्थित होते. अध्यक्ष प्रकाश वरणे यांनी स्वागत केले. डॉ. राजकुमार पोळ यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहलकुमार मणियार यांनी आभार मानले.
एनसीसी मुलींना बक्षीस वितरण
कोल्हापूर : राष्ट्रीय छात्रसेना ६ महाराष्ट्र मुलींचे पथकाचे वार्षिक प्रशिक्षण शिबीरात बक्षीस वितरण झाले. यावेळी ‘एनसीसी’मुळे व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम राहते. त्याचा उपयाग आयुष्यातील पुढील ध्येय साध्य करण्यासाठी होतो. त्यासाठी प्रयत्नशील राहा.’’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. समादेशक अधिकारी कर्नल एस. गणपति उपस्थित होते. राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) ६ महाराष्ट्र मुलींचे पथकाचे १० दिवसाचे वार्षिक प्रशिक्षण शिबीर ११ जूनपासून सुरु झाले. शिबिरात ३०० महाविद्यालयीन मुली सहभागी झाल्या. सर्व मुलीना शारीरिक प्रशिक्षण, मैदानी व युद्ध हस्तकला, नकाशा वाचन, शस्त्र प्रशिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता, आर्मी विषयी माहिती दिली. विविध प्रकारच्या खेळाच्या गार्ड ऑफ ऑनर, ड्रिल, गुणदर्शन स्पर्धा घेतल्या. गटप्रमुख ब्रिगेडीअर समीर साळुंके, प्रशासकीय अधिकारी मेजर गुगामालती ए. सुभेदार मेजर सचिन पाटील, सुभेदार मेजर राजाराम वारंग, कॅप्टन एस.आर. शिंदे, लेफ्टनंट सुजाता पाटील, ऑफिसर एस.जे.जावीर,के.ए.फकीर आदी उपस्थित होते.
30521
राजाराम सुतार यांची निवड
कोल्हापूर : हस्तकला कारागीर कामगार कल्याण संघाच्या कोल्हापूर दक्षिण सरचिटणीसपदी राजेंद्रनगर येथील राजाराम सुतार यांची निवड झाली. जिल्हाध्यक्ष महेश सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस बी. एन. कुंभार यांनी निवडीचे पत्र दिले.
30528
कोल्हापूर : श्री वसंतराव चौगुले पतसंस्था, श्री वसंतराव चौगुले मेमोरिअल ट्रस्टतर्फे शालेय विद्यार्थ्यांना साहित्याच्या वाटपप्रसंगी उपस्थित मान्यवर.
चौगुले पतसंस्थेतर्फे बॅग, वह्या वाटप
कोल्हापूर : वसंतराव चौगुले पतसंस्था, वसंतराव चौगुले मेमोरिअल ट्रस्टतर्फे संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील आणि संचालकांच्या हस्ते तात्यासाहेब मोहिते विद्यालय,वसंतराव चौगुले विद्यालय,अरविंद बालक विद्यालयाच्या विद्यार्थांना शालेय २०० स्कूल बॅग्ज, १२०० वह्यांचे वाटप केले. आंतरभारती शिक्षण संस्थेचे सचिव एम. एस. पाटोळे यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक नितीन चौगुले, नेहा कानकेकर, मुख्याध्यापक रंगराव कांदळकर, मुख्याध्यापिका संजीवनी सावेकर, संस्थेचे उपाध्यक्ष सुमित चौगुले, संचालक सुजय होसमनी, अरुण बरिशेठ, बाजीराव रावण, श्रीकांत नागवेकर,विद्या सरगर, मनिषा कुलकर्णी, सहायक सरव्यवस्थापक तुकाराम पाटील, शशिकांत मोरे, वसंतराव चव्हाण आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69633 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..