
दहावी निकाल
दारवाड विद्यालयाचे यश
कोनवडे : माध्यमिक विद्यालय दारवाड (ता. भुदरगड) शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. शाळेचा या वर्षीचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. शाळेचे १६ विद्यार्थी विशेष प्रावीण्य, ५ विद्यार्थी प्रथम श्रेणी तर ४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमे विद्यार्थी असे : आदिती मुकुंद कुंभार (९२.६०), सृष्टी केरबा महाजन (८८.२०), प्रथमेश राजेंद्र मोहिते (८८). यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे सेक्रेटरी बी. डी. चौगले, मुख्याध्यापिका एम. आर. चौगले, पी. डी. पाटील, यू. एस. चौगले, एस. बी. देसाई, एस. एस. कामत यांचे मार्गदर्शन लाभले.
---
परशुरामचा निकाल १०० टक्के
असळज : गगनबावडा येथील परशुराम विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजने दहावीच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. परीक्षेसाठी ५६ विद्यार्थी बसले होते ते सर्व उत्तीर्ण झाले. २७ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमे विद्यार्थी असे : श्रीदेवी जयंत नायर (९२.४०), रोहिणी सखाराम बरगे (९०.४०), प्रतीक्षा नवनाथ भोसले, (८७.६०). प्राचार्य आर. एम. गोसावी, एस. व्ही. पत्रावळे, के. एस. पावरा, ए. एस. खोराटे, एस. एफ. थोरात, एस. एस. कुंभार, एच. जे. पठाण, एस. बी. लोखंडे, एस. एस. गवस, कुंडले आदींचे मार्गदर्शन लाभले.
---
कांडगाव हायस्कूलचे यश
हळदी ःकांडगाव (ता. करवीर) येथील कांडगाव हायस्कूलचा यंदाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. १०० टक्के निकालाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. गुणानुक्रमे यशस्वी असे : सानिया दत्तात्रय चव्हाण (९३), सिद्धी दयानंद घोसरवाडे (९०.४०), शैलजा भिकाजी शिंदे (८७.४०), समृद्धी चंद्रकांत गायकवाड (८७.४०). यशस्वी विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष मारुती वडगावकर,मुख्याध्यापक एस. आर. पाटील, वर्गशिक्षक बी. पी. मायनवार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
-
कोडोली हायस्कूलचे यश
कोडोली : येथील कोडोली विभाग शिक्षण संघाच्या कोडोली हायस्कूल व भाई शं. तु. पाटील ज्युनिअर कॉलेजचा दहावीचा निकाल ९५.७१ टक्के लागला.
गुनानुक्रमे यशस्वी विद्यार्थी असे, श्रावणी धनाजी शिंदे (९४.२०), ईश्वरी धनंजय गिरी (९३.६०), वैष्णवी तानाजी बागडी (९२.८०). विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी ७५ असून प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थी ९९ आहेत. यास कोडोली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील, उपाध्यक्ष सुलेमान मुल्ला, अमर पाटील, सचिव रवींद्र इंगवले, वसंत पाटील, मुख्याध्यापक एम. बी. बोरगे आदींचे मार्गदर्शन लाभले.
-
भोईटे विद्यालयाचा निकाल 100 टक्के
कसबा वाळवे ः येथील भोईटे विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून, विद्यालयाच्या गायत्री दिलीप फराक्टे व अभिलाषा युवराज पाटील यांनी सेमी इंग्रजी माध्यमात ९५.०० टक्के गुण मिळवले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष अशोकराव फराक्टे, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, बिद्रीचे संचालक उमेशराव भोईटे सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले. मुख्याध्यापक सुरेश संकपाळ व सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69681 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..