दर महिन्याच्या एक तारखेला वेतन झालेच पाहिजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दर महिन्याच्या एक तारखेला वेतन झालेच पाहिजे
दर महिन्याच्या एक तारखेला वेतन झालेच पाहिजे

दर महिन्याच्या एक तारखेला वेतन झालेच पाहिजे

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

३०५६७

वेतन एक तारखेला झालेच पाहिजे
शिक्षकांची मागणी; प्राथमिक शिक्षक संघाची घोषणाबाजी
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २० : जिल्‍हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षकांचे पगार वेळेत होत नाहीत. प्रत्येक तालुक्यात पगार होण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे सर्व शिक्षकांचे पगार एक तारखेला करावेत, या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघाने जिल्‍हा परिषदेच्या आवारात धरणे आंदोलन केले. तसेच मागील दोन महिन्यांचे पगारही झालेले नाहीत. हे पगार तत्‍काळ जमा करावेत, अशीही मागणी करत जोरदार घोषणा दिल्या.
शासनाच्या इतर विभागांचे पगार एक तारखेला होतात. मग शिक्षकांवरच अन्याय का,असा सवाल करत शिक्षक संघांने आंदोलन छेडले. यापूर्वी जिल्‍हा परिषदेतून पगार होत होता. यामध्ये बदल करत वित्त विभागाकडून प्रत्येक तालुक्याला निधी वर्ग करून तालुक्यातून पगार करण्यास सुरुवात झाली. मात्र प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या तारखांना पगार होत आहेत. वेळेत पगार होत नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळेच पगार एक तारखेलाच करावा, या मागणीसाठी आज आंदोलन केले. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दोन तासांत आंदोलन समाप्‍त
अनेक महिने पगार एक तारखेला होत नाही. वेगवेगळ्या तालुक्यात पगाराच्या तारखा वेगळ्या आहेत. हा पगार थेट जिल्‍हा परिषदेतूनच सर्व शिक्षकांच्या खात्यावर एक तारखेला जमा करण्यासाठी माहितीचे संकलन सुरू आहे. हे काम अंतिम टप्‍प्यात असतानाच आज शिक्षक संघाने एक तारखेला वेतन मिळावे म्‍हणून धरणे आंदोलन केले. जिल्‍हा परिषदेच्या आवारात कोणतेही आंदोलन असले तरी ते दुपारनंतरच किंवा सायंकाळी मागे घेतले जाते. मात्र संघाने केवळ दोन तासातच आंदोलन संपवत नवीन पायंडा पाडला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69721 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top