निधी वाटपाला मुहूर्त मिळणार कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधी वाटपाला मुहूर्त मिळणार कधी?
निधी वाटपाला मुहूर्त मिळणार कधी?

निधी वाटपाला मुहूर्त मिळणार कधी?

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

निधी वाटपाला मुहूर्त मिळणार कधी?
लोकप्रतिनिधी नाराज; शासन निर्णयाला प्रशासनाकडून हरताळ

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २० : जिल्‍हा परिषदेच्या विविध विभागांकडून विकासकामांसाठी निधीचे वाटप केले जाते. मार्चनंतर विविध कामांना प्रशासकीय मान्यता दिली जाते. पासाळ्यात निविदा प्रसिद्ध करून कामाचे आदेश दिले जातात. दिवाळीनंतर कामांना सुरुवात होते. एरव्‍ही पदाधिकारी, सदस्यामुळे योजना घेण्यास विलंब होतो, अशी तक्रार होत असे. आता जिल्‍हा परिषदेत प्रशासक असल्याने प्रशासनाला ही संधी नाही. त्यामुळेच लवकरात लवकर निधीचे वाटप व्‍हावे, अशी मागणी माजी पदाधिकारी व सदस्यांकडून होऊ लागली आहे.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी वित्त आयोग, स्‍थानिक विकास कार्यक्रम, दलित वस्‍ती, महिला बालकल्याण, बांधकाम, ग्रामपंचायत, शिक्षण विभागाकडून निधी दिला जातो. निधी वेळेत खर्च करण्याचे आव्‍हान असते. योजनांची निधी कसा खर्च करावा, कोणत्या महिन्यात काय काम करावे, लाभार्थी निवड कधी करावी याबाबत शासन निर्णय आहे. त्याप्रमाणे हे कामकाज झाले तर सर्वच कामे वेळेत मार्गी लागतात व खर्चही वेळेत होतो. मात्र आजपर्यंत कधीही निर्णयानुसार कामकाज झालेले नाही. कारण लोकप्रतिनिधी कामात बदल करतात, लाभार्थी निवडीस विलंब करतात, योजना घेतानाही असाच प्रकार असतो. त्यामुळे खर्चासाठी विलंबास नेहमीच लोकप्रतिनिधींवर ठपका ठेवला जातो. मात्र सध्या प्रशासक असल्याने ठपका ठेवण्याची संधी प्रशासनाला नाही. त्यामुळे वेळेत योजना घेणे, लाभार्थी निवड करणे व त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. सध्या तरी योजना घेण्याबाबत काहीच हालचाली नाहीत. सध्या ग्रामपंचायत विभागाकडे १५ व्या वित्त आयोगाचा निधी उपलब्‍ध आहे. समाजकल्याणकडेही दलित वस्‍तीचा निधी आहे. जिल्‍हा नियोजनकडूनही निधी देण्यात काहीच अडचण नाही. तरीही वितरण रखडले आहे. माजी सदस्य व पदाधिकारी अधिकाऱ्यांना निधी वितरणासाठी भेटत आहेत. पावसाने जोर धरला तर हे सदस्यही जिल्‍हा परिषदेकडे फिरकणार नाहीत. त्यामुळे दोन आठवड्यात किमान काही योजना करून प्रशासकीय मान्यतेचा टप्‍पा पार करणे आवश्यक आहे.


कोट
जिल्‍हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची दररोजच भेट घेऊन निधी वितरण करण्याची विनंती केली जात आहे. शाळा किंवा अंगणवाडी दुरुस्‍ती, ही कामे होणे आवश्यक आहे. काही शाळा पडण्याच्या मार्गावर आहेत. वेळेत दुरुस्‍त झाल्या नाहीतर अनर्थ घडेल. प्रशासनाने अशा शाळांची यादीही घेतली आहे. मग निधी वितरणात अडचण काय?
- प्रसाद खोबरे, माजी सदस्य

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69768 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top