डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकतर्फे कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकतर्फे कार्यशाळा
डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकतर्फे कार्यशाळा

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकतर्फे कार्यशाळा

sakal_logo
By

डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकतर्फे
आज करिअर कार्यशाळेचे आयोजन
कोल्हापूर, ता. २० ः डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकतर्फे दहावीनंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया याबद्दल कार्यशाळा आयोजित केली आहे. मंगळवारी (ता.२१) सायंकाळी ४ वाजता कसबा बावडा येथे पॉलिटेक्निकच्या सेमिनार हॉलमध्ये कार्यशाळा होणार आहे. यात विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले आहे.
दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी हा टप्पा महत्त्वाचा ठरतो. दहावीनंतर नेमके कोणत्या क्षेत्रात जायचे, याबद्दल विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. ही गोष्ट ध्यानात घेऊनच दहावीनंतरच्या करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत, करिअर क्षेत्र कसे निवडावे, याबद्दल मार्गदर्शन केले जाईल. त्याबरोबरच डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया कशाप्रकारे होते, प्रवेशासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, शासनाच्या कोणकोणत्या स्कॉलरशिप शिष्यवृत्ती दिल्या जातात, याबद्दलही या माहिती दिली जाणार आहे. कार्यशाळेत प्राचार्य डॉ. नरके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. नितीन माळी मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69810 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top