शेवगा : समज अन्‌ गैरसमज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेवगा : समज अन्‌ गैरसमज
शेवगा : समज अन्‌ गैरसमज

शेवगा : समज अन्‌ गैरसमज

sakal_logo
By

मृगातच नव्हे, वर्षभर खा शेवग्याची भाजी
----
औषधी गुणधर्म; ३०० विकारांवर उपयोगी, कुपोषण थांबण्यास मदत

लीड
शेवग्याची भाजी मृग नक्षत्र सुरू झाले, की खाल्ली जाते. मात्र, मृग नक्षत्र झाले, की ही भाजी वर्षभर खाल्ली जात नाही. शेवग्याची शेंग जशी वर्षभर खाल्ली जाते, तशाच पद्धतीने पानांची भाजीही पावसाळा अन्‌ हिवाळ्यात खाल्ली पाहिजे. पानांत अनेक महत्त्वाचे घटक आहेत, जे आरोग्य सुदृढ करतात. शेवग्याची फुले, पाने, शेंगांचा पाककृतीत वापर होतो. तुरट असूनही चवीला असलेला शेवगा ३०० विकारांवर मात करणारा, कुपोषण थांबविणारा आहे.
- अमोल सावंत
...
ऋतू संधीकाळ
पावसाळ्याच्या सुरुवातीचे १५ दिवस म्हणजे एक महिन्याच्या कालावधीला ‘ऋतू संधीकाळ’ म्हणतात, कारण वातावरण बदल सुरू होतात. या कालावधीत पाण्यातही बदल होतात. पाणी गढूळ होते. पाण्यात अनेक घातक घटक विरघळतात. पावसाळी पाण्यातून अनेक जलजन्य आजार शरीरात उद्‌भवतात. पचन संस्थेचे आजार होतात. अशा वेळी शेवग्याच्या पानांची भाजी अशा आजारांवर उपयुक्त ठरते. ऋतू संधीकाळाबरोबर पावसाळा अन्‌ हिवाळ्यातही ही पानांची भाजी आवश्‍य खावी.
...
शेवग्याच्या भाजीचे महत्त्व
-रक्तदाब नियंत्रित, आतड्यांची जखम बरी करणारी, पित्त नियंत्रित
-पानाच्या रसात मध घालून अंजन केल्यास डोळ्यांचे विकार बरे होतात
-पानाच्या रसात मिरे वाटून लावल्यास डोकेदुखी थांबते
-रसाने मॉलिश केल्यास केसातील कोंडा जातो
-तोंड येणे, गळ्याची सूज, वांती, खरुजवर भाजी खावी
-शारीरिक थकवा, हाडांची कमजोरी, कृमीवर उपयुक्त
-पचनक्रियेशी संबंधित आजार नष्ट होतात
-काविळीवर पानांचा ताजा रस, एक चमचा मध, नारळ पाणी एकत्र करून घ्यावे
-जठराचा कर्करोग टाळण्यासाठी भाजीचा उपयोग
-फुलांची भाजी संधिवातासाठी उत्तम
...
शेवग्यातील घटक
-शेवग्यात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, जीवनसत्त्वे ए, सी, बी कॉम्प्लॅक्स आढळते
-पानात पीट्रिगोस्पेरमिन तत्त्व असते. ते जीवाणू प्रतिबंधक म्हणून कार्य करते
-दुधाच्या चारपट, मटणाच्या ८०० पट कॅल्शियम, फॉस्फरस शेंगेत अन्‌ भाजीत असते
...
विविध पदार्थही
शेवग्याचा पाला काहीसा तुरट-कडवट चवीचा असतो. मात्र, भाजी केल्यावर तो चविष्ट लागतो. पानांची सुकी भाजी, पातळ भाजी, वड्या, भजी, टिकिया, सूप, झुणका, थालीपीठ, शेवगा पुलाव, शेवगा फुलांची भाजी, फुलांचे भरीत, शेंगेची रसभाजी, पानांची कढी केली जाते.
...
कोट
निसर्गमित्र संस्थेतर्फे १० वर्षे शेवगा महोत्सवाचे आयोजन केले. पाककृती, लागवड, शेवग्याचे महत्त्व लोकांना सांगितले जाते. अनेक लोक ग्रामीण भागात गावरान शेवगा घेत आहेत. त्यामुळे लोकांनी पावसाळा, हिवाळ्यात पानाच्या भाजीचा अन्नात उपयोग केला पाहिजे.’’
-अनिल चौगुले, सचिव, निसर्गमित्र संस्था

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69932 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top