महत्वाच्या दोन बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महत्वाच्या दोन बातम्या
महत्वाच्या दोन बातम्या

महत्वाच्या दोन बातम्या

sakal_logo
By

30755
कोल्हापूर : सुजाता परब-मुसळे लिखित ‘आशावाद एक दृष्टिकोन’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मान्यवर.

प्रत्येक विचार जगण्याची
आशा निर्माण करेल : सरगर
कोल्हापूर, ता. २१ : ‘‘आशावाद एक दृष्टिकोन’ पुस्तकामधील प्रत्येक विचार जगण्याची नवी आशा निर्माण करेल,’’ असे मत न्यू कॉलेजचे उपप्राचार्य टी. के. सरगर यांनी व्यक्त केले.
शिवाजी उद्यमनगरमधील सामाणी हॉलमध्ये सुजाता परब-मुसळे लिखित ‘आशावाद एक दृष्टिकोन’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, ‘सारथी’चे अशोक पाटील अध्यक्षस्थानी होते. सरगर म्हणाले, ‘‘सध्याच्या धकाधकीच्या युगात माणूस अपयशाने खचून गेला आहे. जगण्याची उमेद तो हरवून बसला आहे. अशावेळी ‘आशावाद एक दृष्टिकोन’ पुस्तकांमधील प्रत्येक विचार सकारात्मक ऊर्जा देऊन जाईल.’’ लेखिका परब म्हणाल्या, ‘‘समाजात दिवसेंदिवस वेगवेगळ्या कारणाने तणाव वाढत आहे. अशा परिस्थितीत माणसाचं जीवन आनंदी करण्यासाठी त्यामध्ये सकारात्मक विचारांची पेरणी व्हावी, त्यासाठी हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली.’’ पाटील म्हणाले, ‘‘समाजातल्या प्रत्येक घटकासाठी या पुस्तकातील विचार प्रेरणादायी ठरतील.’’
अभिनेते प्रमोद शिंदे, ताज मुल्लानी, सुहास पाटील, उद्योजक भरत तेंडुलकर, पार्श्व पब्लिकेशनचे राहुल मेहता, ‘गोकुळ’चे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, मंदाकिनी साखरे, संजय माणके, नेहा माणके, विनीत मुसळे आदी उपस्थित होते. प्रकाश सुतार यांनी सूत्रसंचालन केले.
...
भारती विद्यापीठ तंत्रनिकेतनमध्ये
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस मान्यता
कोल्हापूर, ता. २१ : भारती विद्यापीठ तंत्रनिकेतनला महाराष्ट्रात राज्य तंत्र शिक्षण संचालनालय मुंबईतर्फे प्रथम आणि थेट द्वितीय वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत सुविधा केंद्र (एफ.सी. ६४२२) म्हणून मान्यता मिळाल्याची माहिती प्राचार्य महेश देशमुख यांनी दिली. डिप्लोमा अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे, प्रवेश अर्जाची निश्‍चिती करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. हे सुविधा केंद्र कोल्हापूर आणि परिसरातील इतर विद्यार्थी, पालकांच्या सोयीचे आहे. इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या तसेच बारावी सायन्स, एमसीव्हीसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी डिप्लोमा अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. अभ्यासक्रम पूर्ण होण्याअगोदर नोकरीची संधी आणि डिग्री इंजिनिअरिंगमधील सुलभतेमुळे डिप्लोमा अभ्यासक्रमाकडे पाहिले जाते, असे प्राचार्य देशमुख यांनी सांगितले.
...
राजर्षी शाहू संघातर्फे आज सभा
कोल्हापूर : राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (ता. २२) सायंकाळी चार वाजता अध्यक्ष डी. एस. घोलराखे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. बाळासाहेब ठाकरे विरंगुळा केंद्र, टाऊन हॉल येथे सभा होईल. तसेच या महिन्यातील ज्या सभासदांचे वाढदिवस आहेत, अशा सभासदांचा संघामार्फत सत्कार करण्यात येणार आहे.
...
30780
तानाजीराव पाटील अध्यक्षपदी
कोल्हापूर : वडणगे शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी तानाजीराव पाटील, उपाध्यक्षपदी वसंतराव नाईक यांची निवड झाली. सचिव प्रा. डॉ. विलासराव पोवार, सर्व संचालक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70011 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top